महानगरपालिकेने दुर्लक्ष केले म्हणून आमदारांनी संपूर्ण प्रभागच घेतला दत्तक
Dhule धुळे : मुलभूत सोयी-सुविधांच्या बाबतीत तब्बल २५ वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या नगावबारी परिसराकडे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनीही सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे नगावबारीचा प्रभाग क्रमांक दोन दत्तक घेण्याचा निर्णय आमदार फारुक शहा यांनी घेतला आहे. या परिसरातील एका रस्ते कामाचा शुभारंभ करताना त्यांनी तशी घोषणा केली.
धुळे महानगरपालिका क्षेत्रात सोयी-सुविधा विकास योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन कल्याणी बंगला ते केंद्रीय विद्यालय, डॉ. महेंद्र वाढे यांचे निवासस्थान ते केंद्रीय विद्यालयपर्यंत रस्ता कामाचा शुभारंभ आमदार फारुक शहा यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. धुळे शहरात सुमारे २५ ते ३० वर्षांपासून वसलेल्या कॉलनी आणि झोपडपट्ट्यांमध्ये रस्ते, गटारी नसल्यामुळे येथील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष हे कुचकामी ठरलेले आहेत. दरम्यान, आमदार फारुक शहा यांच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांनी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे आपल्या समस्या मांडायला सुरुवात केली आहे. आपल्या भागातील रस्ते, गटारी, पाण्याची सुविधा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी नागरिक फार अपेक्षेने आमदार फारुक शहा यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहु लागले आहेत.
आमदार फारुक शहा यांनी धुळे शहरातील अनेक भागात रस्ते व गटारीसाठी व मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त करून घेतला आहे. त्यातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या रस्ते कामाचा शुभारंभ आमदार फारुक शहा यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराला धुळेकर नागरिक कंटाळले आहेत. सत्ताधारी नगरसेवक तसेच पदाधिकारी फक्त शहरातील नागरिकांच्या कररुपी पैशांवर डल्ला मारण्याच्या प्रयत्न करीत आहेत. मात्र आमदारांच्या प्रयत्नांमुळे आज अनेक भागात विकासकामे सुरू आहेत. महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांपासून धुळेकरांना विकासापासून वंचित ठेवले आहे, हे धुळेकर जनता जाणून आहे. येत्या निवडणुकीत मतदार त्यांना घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आमदारांनी यावेळी व्यक्त केला.
नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
या कार्यक्रमाला परिसरातील प्रतिष्ठीत नागरिकही उपस्थित होते. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सुमारे 30 ते 40 वर्षांपासून अनेक आमदार आले. परंतु फारुक शहा यांना आम्ही मागणी केली आणि त्यांनी ताबडतोब मागणी मान्य करत या रस्त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल या भागातील नागरिकांनी आमदार फारुक शहा यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला नगरसेवक गनी डॉलर, डॉ. दीपश्री नाईक, डॉ. बापुराव नाईक, निजाम सय्यद, नजर पठाण, आसिफ शाह, प्यारेलाल पिंजारी, आर. व्ही. पाटील, डॉ. महेंद्र वाढे, रवींद्र भदाने, भटू पवार, शिवाजी मोरे, रतीलाल शिंदे, विकास सूर्यवंशी, प्रदीप पवार, डी. टी. पाटील, राकेश खांडेकर, कैलास चव्हाण, राजेश चव्हाण, शिरसाठ सर, शर्मा काकाजी, विजय शिंदे, नरेश पाटील, योगेश शिरसाठ, देविसिंग जाधव, संतोष पाटील, देविदास माळी, एल. एन. गिरासे, बी. डी. राजपूत, सुभाष जाधव, नाना महाजन, धनराज विभांडिक, गणेश भामरे, रोहित सानप, इकबाल शाह, शहजाद मन्सूरी आदी उपस्थित होते.