नंदाळे सोसायटी चेअरमनपदी साहेबराव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी धनराज पाटील बिनविरोध
Dhule धुळे : तालुक्यातील नंदाळे बु. येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया झाली.
धुळे तालुका डीडीआर कार्यालय येथे ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. बाळासाहेब भदाणे यांच्या गटाचे ग्रामविकास पॅनलच्या वतीने चेअरमनपदी साहेबराव निंबा पाटील व व्हाईस चेअरमनपदी धनराज विश्वनाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी चेअरमन संजय नामदेव पाटील, गुलाब रामकृष्ण पाटील, वत्सलाबाई दिनकर पाटील, अमोल इंद्रभान पाटील, संजय वाल्मीक वाघ, तुळशीराम खंडू पाटील, दिवाण दिनकर पाटील, निलेश पाटील, समाधान पाटील, धनराज मुकुंदा पाटील, शेषराव रामभाऊ पाटील, साहेबराव पाटील, माधुरी विश्वनाथ पाटील, तालुका विधानसभा अध्यक्ष धुळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.