शेतकऱ्यांना पाईप, ताडपत्री, चक्की, शिलाई मशीन मोफत, आजच करा अर्ज
धुळे : सन 2023-2024 या वर्षांसाठी जिल्हा परिषदेच्या 20 टक्के निधीतून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, नवबौद्ध, विजाभज या प्रवर्गातील मागासवर्गीय शेतकऱ्यांनी वैयक्तिक लाभ योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वैयक्तिक लाभ योजनेत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध, विजाभज या प्रवर्गातील मागासवर्गीय शेतकऱ्यांनी एच. डी. पी. ई, पी. व्ही. सी. पाईप, ताडपत्री, मागसवर्गींयासाठी पिठाची गिरणी, ग्रामीण भागातील महिलांसाठी सिंगल निडल लॉक स्टिच शिलाई मशिन, डी. डी. मोटर सह 100 टक्के 20 टक्के सेस फंड अनुदानातून देण्यात येईल.
येथे करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील पंचायत समितीकडून अर्ज घेवून आवश्यक त्या कागदपत्रासह पंचायत समिती कार्यालयात 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत अर्ज सादर करावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा अश्विनी पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनिष पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.