आमदारांच्या विकासकामांमुळे दुर्लक्षित वस्त्यांचा झाला विकास
धुळे : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 जामचा मळा भागात काँक्रीट रस्ते व गटार काम करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार फारूख शाह यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.
प्रभाग क्रमांक 19 भागात सुमारे पाच वर्षांपूर्वी एकही रस्ते व गटार नव्हती. तसेच या प्रभागात मूलभूत सुविधांचा अभाव होता. परंतु आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने व या प्रभागाच्या नागरिकांच्या मागणीनुसार संपूर्ण प्रभागात 75 टक्के रस्ते व गटारीची कामे झाली आहेत. या प्रभागात आजपर्यंत कोणत्याच आमदारांनी एक दमडीचाही निधी उपलब्ध करून दिला नव्हता. त्यामुळे या भागात सुविधांचा अभाव होता. या प्रभागात पावसाळ्यात नागरिकांचे फार हाल होत होते.
पावसाळ्याचे पाणी साचल्यामुळे लोकांना चालणे सुद्धा दुराप्रास्त होते. तसेच गटार नसल्यामुळे सर्व पाणी परिसरात पसरत होते. आ. फारुख शाह यांनी या परिस्थितीच्या विचार करून या चार वर्षात या प्रभागात रस्ते, गटार व पाईपलाईनसाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आ. फारुख शाह यांनी शहराच्या विविध भागात आजपर्यंत रस्ते गटार पाईपलाईन व शहराच्या सुशोभीकरणासाठी शेकडो कोटी रुपयाचा निधी आजपर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे. नागरिकांची मूलभूत सुविधांसाठी व त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून शहराचा कसा विकास होईल यावर आमदारांचे प्रयत्न आहेत. आज प्रभाग क्रमांक 19 येथे जामचा मळा अंतर्गत 50 लाख रुपये कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या भागातील नागरिकांनी आ. फारुख शाह यांचा सत्कार केला.
यावेळी हाफिज दानिश मौलाना, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक आमिर पठाण, नगरसेवक गनी डॉलर, सलीम शाह, डॉ. दीपश्री नाईक, अनिस शाह, डॉ. बापुराव पवार, प्यारेलाल पिंजारी, मौलाना शकील, शरीफ पठाण, फुझेल आझमी, अयाझ शेख, आसिफ शाह, शहजाद मंसुरी, नजर पठाण, अजहर सैय्यद, इरफान शेख, जीड्या पहिलवान, हलीम शमसुद्दिन, अल्ताफ मिर्झा, शगिर पिंजारी, एजाज सैय्यद, चांद पिंजारी, शहजाद मणियार, जमील खाटीक, शोएब मुल्ला, माजीद पठाण, वसिम मंसूरी, छोटू मच्छीवाले, गफ्फार शेख, इंजि.अफसर शाह यांच्यासह या परिसरातील नागरिक उपस्थित होते.