एसएसव्हीपीएस महाविद्यालयात रंगला कबड्डीचा आखाडा
धुळे : येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियाना अंतर्गत शनिवारी जिल्ह्यातील खेळाडुंसाठी कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि शहरी भागातील तरुणांमधील कबड्डी या खेळाविषयी असणारी आस्था संवर्धित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साध्य होत असताना आपले आरोग्य सुदृढ असणेही काळाची गरज आहे. हे सुद्धा या स्पर्धांच्या माध्यमातून साध्य होणार आहे. या स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयातील क्रीडा विभागातर्फे करण्यात आले. मुंबई येथील इंडियन ऑइल कंपनीने या स्पर्धा सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा शुभारंभ माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. टी. पाटील, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परषदेचे माजी सदस्य डॉ. मोहन पावरा, डॉ. अभयकुमार खैरनार, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सदाशिव सूर्यवंशी, प्रशांत भदाणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश पाटील, डॉ. भैय्या पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शरद भामरे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्पना पाटील आदी उपस्थित होते.