भाजपच्या विकासकामांचे श्रेय सुप्रिया सुळे यांनी घेऊ नये : देवेंद्र फडणवीस
पुणे : पुणेकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे, म्हणजे वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. कारण चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं लोकार्पण नुकतच करण्यात आलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं मोठ्या दिमाखात लोकार्पण करण्यात आलं. पुणे येथील चांदणी चौकाच्या पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले, परंतु या पुलाच्या कामाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला आहे, तसं सुप्रिया सुळे यांनी ट्विटही केला आहे, परंतु चांदणी चौकातील पुल व्हावा यासाठी भाजपाच्या माजी आमदार मेघा कुलकर्णी, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने आवाज उठवला आणि अखेर या फुलाचे काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकार्पण करण्यात आले.
या पुलाच्या कामाचे खरे शिलेदार भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार मेघा कुलकर्णी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.