एक हजार १११ फुट तिरंगा ध्वज रॅलीमुळे शहरात देशभक्तीचे वातावरण
Dhule News धुळे : शहरात एक हजार १११ फूट लांबीचा तिरंगा ध्वज उंचावत शाळकरी विद्यार्थी, सर्वसामान्य जनता आणि नेत्यांनी भारत मातेचा जयघोष करत संपूर्ण शहर देशभक्तिमय वातावरणात रंगवून टाकले.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत सोमवारी छत्रपती अग्रसेन महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावरून तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १४ ऑगस्ट या अंखड भारत संकल्प दिनानिमित्त सकाळी ९.३० वाजता तिरंगा ध्वज रॅलीला मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज स्मारकापासून सुरुवात झाली.
या रॅलीत विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनींसह सर्वसामान्य जनता, महिला, राजकीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारत मातेची प्रतिमा पूजन करून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये डिजेवर देशभक्ती गिते लावण्यात आली होती. आग्रा रोडवरून ही रॅली जात असताना देशप्रेमी जनतेने, व्यापाऱ्यांनी पुष्पवृष्टी केली.महात्मा गांधी स्मारकाजवळ दुपारी १२ वाजता रॅलीचा समारोप झाला.
या रॅलीमध्ये खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा जयश्री आहिरराव, उप महापौर वैशाली वराडे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, सभागृह नेत्या भारती माळी, महिला बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, उपसभापती विमल पाटील, मायादेवी परदेशी, बेटी बचाव -बेटी पढाव अभियानाच्या अल्पा अनुप अग्रवाल, पुष्पा बडगुजर, मोहिनी गौड, स्नेहल जाधव, विजय पाच्छापूरकर, शितल नवले, ओमप्रकाश खंडेलवाल, हर्षकुमार रेलन, भिकन वराडे, अमोल मासुळे, देवा सोनार, सुनील बैसाणे, रावसाहेब नांद्रे, विकी परदेशी, मोहन टकले, दिनेश बागुल, बापू खलाणे, अनिल थोरात, सुबोध पाटील, मनोज शिरुडे, राकेश कुलेवार, रोहित चांदोडे, हिरामण गवळी, प्रशांत बागुल, अनिल नागमोते, सागर वाडेकर, सुहास अंपळकर, पंकज धात्रक, आकाश परदेशी, विजय जाधव, मयूर सूर्यवंशी, राज कोळी, बबन चौधरी, नरेश चौधरी, भिलेस खेडकर, पप्पू ढापसे, जयेश मगर, किरण अहिरे ,
तुषार नवले उपस्थित होते. हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने अनुप अग्रवाल व रोहित चांदोडे यांनी रॅलीचे आयोजन केले होते.
हेही वाचा