• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home राज्य

Cabinet decision सर्व आदिवासी पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार!

भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार

no1maharashtra by no1maharashtra
19/08/2023
in राज्य
0
Cabinet decision सर्व आदिवासी पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार!

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या आदिवासी दुर्गम पाड्यांमध्ये हे संग्रहित छायाचित्र आहे.

0
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सर्व आदिवासी पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार!

मुंबई : राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  हा प्रकल्प सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा असेल. एकंदर 6838 कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.
धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या आदिवासी दुर्गम पाड्यांमध्ये हे संग्रहित छायाचित्र आहे.
आदिवासी गावे आणि पाड्यांमध्ये रस्त्यांअभावी अनेक दुर्देवी घटना घडतात.  या योजनेमुळे मुख्य रस्त्यांशी या वाड्यांचा सातत्याने संपर्क राहील.  नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात सर्व आदिवासी पाडे बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी नवीन भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना राबविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या रस्त्यांसाठी आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र समिती असेल तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हे रस्ते बांधेल.
 त्यानुसार या योजनेंतर्गत सर्व आदिवासी वाडे/पाडे यांना बारमाही मुख्य रस्त्याशी जोडणे, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व आठमाही रस्ते बारमाही करणे आणि आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र /आश्रमशाळा यांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या योजनेमुळे आदिवासी जनतेस मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.
हेही वाचा

‘शिरपूर पॅटर्न’चा खरा चेहरा, आदिवासी महिलेच्या प्रसुतीसाठी बांबुची झोळी अन् सहा किलोमीटरची पायपीट

गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा
राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील  (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल.
राज्यातील एकूण १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगीक खर्चासह ८२७ कोटी ३५ लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली.  प्रती संच २३९ रुपये या दराने हा शिधा जिन्नस संच खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.
आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ, आता दरमहा ५०० रुपये मिळणार
शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती.
या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक समाजातील व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील प्रशिक्षणार्थ्यांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या मर्यादेत आहे अशा सर्व प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० रूपये इतके विद्यावेतन महाडीबीटी पोर्टलमार्फत देण्यात येईल. याकरीता शासनावर दरवर्षी ७५.६९ कोटीचा आर्थिक भार पडणार आहे.
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
राज्य शासनाने महाराष्ट्र कॅसिनोज (नियंत्रण आणि कर) अधिनियम, 1976 पारीत केला आहे. मात्र जवळपास 45 वर्षे होऊन गेली तरी देखील तो अंमलात येऊ शकलेला नाही.  या अधिनियमाची अंमलबजावणी राज्यात करावयाची किंवा कसे या संदर्भात वरीष्ठ पातळीवर साधक-बाधक विचारविमर्श होऊन महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा स्वरुपाचा कायदा अंमलात आणण्यात येऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
त्यानुषंगाने महाराष्ट्र कॅसिनोज (नियंत्रण आणि कर) अधिनियम, 1976 हा कायदा निरसित करण्याबाबतचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ  बैठकीमध्ये ठेवण्यात आला होता. या बैठकीमध्ये हा कायदा निरसित करून  त्यानुषंगाने विधिमंडळास विधेयक सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे, पुनर्विकासासाठी परवानगी
मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे अटी व शर्तींच्या अधीन राहून विशेष बाब म्हणून पुनर्विकासासाठी परवानगी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
फोर्ट मधील भूकर क्र.9/729 येथील मिळकत शासनाने 1994 पासून 30 वर्षाच्या कालावधीसाठी प्रेस क्लब, मुंबई यांना दिली आहे.  2017 तसेच 2018 मध्ये राज्य शासनाने पुनर्विकासास व पुर्नबांधकामास परवानगी देण्याच्या धोरणात सुधारणा केली.  त्यानंतर या मिळकतीला अधिमुल्य आकारून 22 मार्च 2021 च्या ज्ञापनान्वये काही अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली होती.  मुंबई प्रेस क्लबने केलेल्या विनंतीवरून पुनर्विकास अधिमुल्य आकारण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई प्रेस क्लबमध्ये काही भागाचा वाणिज्यिक वापर होत असल्याने मुंबई शहर जिल्हाधिकारी यानी शर्तभंग नियमानुकूल करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून काही अटी व शर्तीच्या अधिन राहून या विकासास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रेस क्लबच्या या मिळकतीच्या भाडेपट्टयाचा कालावधी  1 नोव्हेंबर 2024 रोजी संपत असून इमातीच्या पुनर्विकासासाठी परवानगी देतांना भाडेपट्टयाच्या नुतनीकरणाबाबतचा निर्णय घेण्यात याव्या अशी सूचनाही जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.
दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना, सुधारित निवृत्तीवेतन
राज्यातील दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाने शिफारस केली होती. या शिफारशी लागू केल्यामुळे थकबाकीपोटी ५५८ कोटी १६ लाख आणि आवर्ती खर्च ७९ कोटी ७३ लाख एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली.  या न्यायिक अधिकाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ जून २०२३ या कालावधीतील थकबाकीची २५ टक्के रक्कम ३१ ऑगस्ट २०२३ पूर्वी देण्यात येतील.  तसेच २५ टक्के रक्कम ३१ ऑक्टोबर २०२३ पूर्वी आणि ५० टक्के रक्कम ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी रोखीने देण्यात येतील.
कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास नियोजन करण्याच्या, राज्य मंत्रिमंडळाच्या सूचना
राज्यात सरासरीच्या 89 टक्के पाऊस झाला आहे.  मागील वर्षी सरासरीच्या 122.8 टक्के पाऊस झाला होता. पुढील काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.  याअनुषंगाने कृषी तसेच महसूल व संबंधित विभागांनी नियोजन करावे तसेच चारा, वैरण, पिण्याचे पाणी या अनुषंगाने योग्य ते नियोजन तयार ठेवावे  अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
कृषी विभागाने आज बैठकीत माहिती दिल्याप्रमाणे राज्यात 139.35 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 91 टक्के पेरणी झाली आहे.  100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले 6 जिल्हे असून, 75 ते 100 टक्के पाऊस झालेले 13 जिल्हे आणि 50 ते 75 टक्के पाऊस झालेले 15 जिल्हे आहेत.  राज्यात 25 ते 50 टक्के पाऊस झालेले 13 तालुके आहेत.
सध्या राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात 61.90 टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 80.90 टक्के पाणी साठा होता.  नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या 70.47 टक्के, अमरावती 66.57 टक्के, औरंगाबाद 31.65 टक्के, नाशिक 57.16 टक्के, पुणे 68.23 टक्के आणि कोकण 87.25 टक्के अशी पाणी साठ्याची स्थिती आहे.
सध्या राज्यात 329 गावे आणि 1273 वाड्यांमधून 351 टँकर्स सुरु आहेत.
केंद्राच्या सूचनेप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम, राज्याचा हिस्सा वाढला
केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रमा राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या अभियानात आता राज्याचा हिस्सा वाढून 40 टक्के एवढा झाला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
2018-19 या आर्थिक वर्षापासून राज्यात राबविण्यात येणारा पोषण अभियान हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम केंद्र शासनाने पोषण 2.0 अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता  राज्यात राबविण्यात येईल. पूर्वी या कार्यक्रमासाठी केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा 80:20 असा होता पण आता तो सुधारित होऊन 60:40 असा करण्यास मान्यता देण्यात आली.  या पोषण अभियानात 0 ते 6 वर्षे बालकांमध्ये खुजे आणि बुटके पणाचे प्रमाण तसेच कुपोषण, रक्तक्षय कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.  यामध्ये अंगणवाडी सेविकांना रियल टाईम मॉनिटरीसाठी मोबाईल फोन, सीमकार्ड उपलब्ध करून देण्यात येतात.  तसेच प्रशिक्षणही देण्यात येते.  राज्याच्या वाढीव हिश्यापोटी 153 कोटी 98 लाख असा खर्च अपेक्षित आहे.
सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा, अध्यादेश मागे
सहकारी संस्था अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासाठी ७ जून २०२३ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेला वर्ष २०२३ चा अध्यादेश क्र.२ मागे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
क्रियाशील सदस्यांबाबतचा मजकूर वगळणारा अधिनियम २८ मार्च २०२२ रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, सहकारी संस्थांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यावरुन या वगळण्यात आलेल्या तरतुदी ७ जून २०२३ रोजीच्या शासन राजपत्रात नव्याने समाविष्ट करण्याबाबत अध्यादेश क्र.२ प्रसिद्ध करण्यात आला.
परंतु या तरतुदी पुन्हा समाविष्ट केल्यास सहकारी संस्था आणि सभासदांसाठी अडचणीच्या ठरून वारंवार कायदेशीर तंटा निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन सदरील अध्यादेश मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
No1 Maharashtra News Portal
Tags: Cabinet decisiondevendra fadnvisEknath Shinde CMVijaykumar Gavitwill connect all tribal padas with the main road!मंत्रिमंडळ निर्णयमंत्रिमंडळ बैठकसर्व आदिवासी पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार!
ADVERTISEMENT
Previous Post

Sale of spurious fertilizers शेतकऱ्यांनो सावधान! सोनगीरला बनावट खतांची विक्री

Next Post

Meri Mati Mera Desh ‘मेरी माटी, मेरा देश’अभियानातून शहिद वीरांना वंदन

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Meri Mati Mera Desh ‘मेरी माटी, मेरा देश’अभियानातून शहिद वीरांना वंदन

Meri Mati Mera Desh 'मेरी माटी, मेरा देश’अभियानातून शहिद वीरांना वंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us