पत्रकारांनी केली पत्रकार संरक्षण कायद्याची होळी
धुळे : राज्यात पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे पत्रकार सरक्षण कायदा अस्तिवात असताना त्याची अंमलबजावणी होत नाही. या निषेधार्थ धुळ्यात पत्रकारांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन आपली एकजूट दाखवत या संरक्षण कायद्याची होळी करून रोष व्यक्त केला. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कायद्याची सक्त अंमलबजावणी आणि आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली.
पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ १७ ऑगस्ट रोजी राज्यभर एकाच दिवशी या संरक्षण कायद्याची होळी करून आंदोलन केले. धुळ्यात मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न पत्रकार हल्ला विरोधी कृती समती यांच्या पुढाकाराने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ, भारतीय पत्रकार संघ, खानदेश पत्रकार संघ, धुळे तालुका मराठी पत्रकार संघ, जन ग्रामीण पत्रकार संघ, वाईस ऑफ मीडिया यांच्यासह इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रतिनिधी, छायाचित्रकार यांनी धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यानजीक एकत्र येऊन आपली एकजूट दर्शवली. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा, हल्ले करणाऱ्यांचा आणि कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून पत्रकारांनी आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर सर्व पत्रकारांनी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची भेट घेऊन चर्चा केली.
पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत कायद्याची सक्त अंमलबजावणी झाली पाहिजे. पाचोर्याच्या घटनेत पत्रकारास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आमदार किशोर पाटील याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याचे विधानसभेतील सदस्यत्त्व रद्द व्हावे, अशा मागण्या करून निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाला प्रा.अनिल चव्हाण, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मनोज गर्दे, सचिव सचिन बागुल, कोषाध्यक्ष अतुल पाटील, मुंबई प्रांतिक सदस्य तुषार बाफना, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, बापू ठाकूर, दिलीप विभांडिक, मिलिंद बैसाणे, सुनील पाटील, देवानंद अहिरे, राजेंद्र गर्दे, गोपी लांडगे, नथू गुजर, अरुण पाटील, रोहिदास हाके, प्रभाकर सूर्यवंशी, राजेंद्र सोनार , शैलेश साळे, चुडामन पाटील, रणजीत शिंदे, गोरख पाटील, निंबा मराठे, किशोर पाटील, अजय भदाने, शिवाजी पाटील, सतिष भावसार, गजेंद्र पाटील, भटू पाटील, विशाल पाटील, राकेश गाळणकर, विठोबा माळी, दीपक देवरे, उमाकांत पाटील, प्रमोद वाणी, अमोल पाटील, पी. एल. पाटील, हेमंत जगदाळे, मनीष मासुळे, गोरख गर्दे, योगेश पाटील, धनंजय गाळणकर, बी. के. सूर्यवंशी, धनंजय दीक्षित, नितीन इंगळे, दिग्विजय गाळणकर, योगेश ईशी, चंद्रकांत महाजन, महेंद्र येवले, भरतसिंग राजपूत, उमेश कढरे, जॉनी पवार, मुरलीधर जाधव, रामकृष्ण पाटील, रमेश बोरसे, संजय देवरे, संदीप अहिरे, रमेश करनकाळ, एम. जे. मकासरे यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या आंदोलनासाठी मालेगाव येथून महाराष्ट्र रक्षक न्यूजचे युसुफ पठाण खान यांची उपस्थिती होती.
यांनी दर्शवला पाठिंबा : तसेच चंद्रशेखर पाटील, हेमंत मदाने, योगेंद्र जुनागडे, आशुतोष जोशी, प्रा. जसपाल सिसोदिया, सुनील बैसाणे, राजेंद्र शर्मा, निखिल सूर्यवंशी, विलास पवार, संतोष मासोळे, नितीन जाधव, निलेश भंडारी, निलेश बोरसे, धर्मेंद्र जगताप, राम निकुंभ, मनोहर सोलंकी नितीन बच्छाव यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे कळविले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस .एम देशमुख यांच्या पुढाकाराने विविध १८ संघटनांनी एकत्र येऊन आज १७ ऑगस्ट रोजी राज्यभर एकाच दिवशी या संरक्षण कायद्याची होळी करून आंदोलन केले.
हेही वाचा