शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुसज्ज ग्रंथालय
धुळे : शहरातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध इमारतींसाठी आमदार फारुख शाह यांनी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला आहे. तो एक रेकॉर्ड आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुद अंतर्गत शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या परिसरात ग्रंथालय इमारत व आवार भिंतीचे बांधकाम करणे कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला.
धुळे शहरातील एमआयडीसी येथील विभागीय कार्यालय, फायर स्टेशन, आदिवासी प्रकल्प इमारत, दारूबंदी कार्यालय, जिल्हा परिवहन कार्यालय, जजेस क्वार्टर, जिल्हा रुग्णालयाच्या नवीन 200 खाटांचे बांधकाम, हिरे मेडिकल येथील वसतीगृह बांधकाम यासाठी आमदारांनी शासनाकडून शेकडो कोटींचा निधी आपल्या प्रयत्नाने शहरासाठी उपलब्ध करून दिला आहे. आजपर्यंत शहराच्या विविध कार्यालय इमारतीसाठी रेकॉर्ड ब्रेक निधी आणण्याचे काम आमदारांनी केले आहे. तसेच सर्व कार्यालय एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारतीचे काम सुद्धा लवकर सुरू होणार आहे. या सर्व कामाचा एक भाग म्हणून गुरूवारी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शासकीय तंत्रनिकेतन येथे ग्रंथालय व आवार भिंतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. वाडेकर, के. आर. पवार, डॉ. अन्सारी, इतर शिक्षक वृंद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, उपअभियंता किरण पाटील, राहुल माळी, शहेबाज शाह, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक आमिर पठाण, डॉ. दीपश्री नाईक, डॉ. बापुराव पवार, आसिफ शाह, प्यारेलाल पिंजारी, निजाम सैय्यद, कैसर अहमद, नजर पठाण, अकीब अली, माजिद पठाण, जीड्डया पहिलवान, सिराज मलिक, अजहर सय्यद, शहजाद मंसूरी, शाहरुख कुरेशी, मोईन शेख, साकीब शाह, जुबेर शेख, समीर शाह, नदीम मिर्झा, मुजाहीद बागवान, साजिद शाह आदी उपस्थित होते.