शरद पवारांनी सत्तेवर असताना मराठा समाजाला न्याय का दिला नाही?
धुळे : राज्य आणि केंद्रात सत्तेवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मराठा समाजाला का न्याय दिला नाही असा प्रश्न देशाचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच शरद पवार यांनी याचे उत्तर जनतेला द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
धुळे शहरात भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
खासदार सुभाष भामरे यांनी सांगितले की, जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनाच्या वेळेस जो लाठीमार झाला जी काही घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे त्यात काही वादच नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली आहे हा प्रकार नेमका कशामुळे आणि कुणामुळे घडला हे चौकशीत समोर येईलच त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी शांतता ठेवावी मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे म्हणून हा प्रश्न निकाली निघणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करणे देखील आवश्यक आहे अशा दुर्दैवी घटनेचे कुणीही राजकारण करू नये परंतु देवेंद्र फडणवीस सरकार असताना खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाला चालना मिळाली आणि ते आरक्षण देण्यात यशस्वी झाले पुढे सुप्रीम कोर्टात अडचण निर्माण झाली त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते सुप्रीम कोर्टात आपण चांगल्या पद्धतीने बाजू का मांडू शकलो नाहीत याचे उत्तर महाविकास आघाडीने जनतेला द्यावे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे शरद पवार यांनी याचे उत्तर द्यावे अनेक वेळा ते मुख्यमंत्री राहिले तसेच केंद्रातही मोठे मंत्री होते तरी देखील आतापर्यंत ते मराठ्यांना न्याय का देऊ शकले नाहीत असा प्रश्न खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणाशी संबंधित या घटनेचे कुणीही राजकारण करू नये, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारतीय जनता पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यासंदर्भात प्रयत्नशील आहेत आणि येणाऱ्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळेलच असा विश्वास खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा