पाणीप्रश्नी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम, काॅंग्रेसचा आंदोलनाचा इशारा
धुळे : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करीत, भारतीय जनता पक्षाचे सरकार लोकशाहीला पायदळी तुडविण्याचे काम करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांनी केली.
धुळे शहरात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेऊन पाणी प्रश्नावर तसेच मराठा आरक्षणाबाबत निवेदन दिले.
युवराज करण काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पावसाने दडी मारल्याने अक्कलपाडा प्रकल्पातून नकाने तलाव भरून घ्यावा. भाजपची सत्ता आली तर एक दिवसाआड पाणी देऊ असा शब्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता. परंतु तसे काही घडले नाही. याउलट पाच दिवसात मिळणारे पाणी आता धुळेकरांना आठ ते दहा दिवसात मिळू लागले आहे. अक्कलपाडा योजनेचा पाणीपुरवठा केव्हा सुरू होईल हे निश्चित माहित नाही. त्यामुळे धुळेकर नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडून नकाणे तलाव भरून घेणे आवश्यक आहे. आठ दिवसात अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेतून नियमित पाणी मिळाले नाही तर काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा युवराज करनकाळ यांनी दिला.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमामाणूष लाठी हल्ल्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणात पोलिसांना दोष देण्यात काही अर्थ नाही. वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतरच लाठीहल्ला झाला आहे. मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीला पायदळी तुडविण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोपही युवराज करत काळे यांनी केला.