काॅंग्रेसचे शेतकरी जन आक्रोश आंदोलन
धुळे : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम त्वरीत द्यावी, अशी मागणी करीत काॅंग्रेसने धुळ्यात मंगळवारी शेतकरी जन आक्रोश आंदोलन केले. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या खरीप हंगामात धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णत: करपली आहेत. तब्बल २५ ते ३० दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे. म्हणून हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान या तरतुदी अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (Mid Season Adversity) नुसार शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम तातडीने द्यावी. बीड जिल्ह्यात शासनाने पीक विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम विमा रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला. धुळे जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना सरकारने अद्यापही पीक विमा कंपनीला अग्रीम विमा रक्कम धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना केल्या नाहीत. यावरुन सरकार शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत आहे. म्हणून आपल्या पातळीवर शेतकऱ्यांना अग्रीम विमा रक्कम तातडीने देण्याबाबतच्या सूचना व्हाव्यात.
धुळे जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान ४२५ मीमी पाऊस होणे अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ २६८ मीमी एवढाच पाऊस झाला. गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फीरविल्याने पिके करपू लागली आहेत. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होवून खरीप हंगामात पेरणी केली. मात्र पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेला. याचा परिणामी शेतकऱ्यांच्या खरीपाच्या उत्पन्नावर होणार असून खरीप हंगाम पूर्णपणे तोट्यात गेला आहे. आजही जिल्ह्यात नदी, नाले, छोटे मोठे पाझर तलाव कोरडे आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. आतापासूनच पाण्याची व चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यात पाऊस नसल्याने याचा परिणाम खरीपाबरोबरच रब्बी हंगामावरही होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करुन दुष्काळातील उपाययोजना तातडीने कराव्यात.
प्रमुख मागण्या अशा: १ धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. २ शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान द्यावे. ३ शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी. ४ शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. ५ कृषी पंपांचे वीज बिल माफ करावे. ६ चारा छावण्या सुरू कराव्यात. ७ विद्यार्थ्यांची सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ८ शेतसारा माफ करावा. ९ रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत. १० शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर कराव्यात. ११. शेती पंपांचा वीज पुरवठा सुरळीत करावा.
यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, पंचायत समितीचे सभापती बाजीराव पाटील, गुलाबराव कोतेकर, भगवान गर्दे, लहू काशिनाथ पाटील, साहेबराव खैरनार, रावसाहेब पाटील, आनंदा पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, चंद्रसिंग गिरासे, भोलेनाथ पाटील, एकनाथ श्रीराम, भटू गवळी, पन्नालाल शांतीलाल, कीर्तिमंतराव कोथळकर, गणेश गर्दे, निलेश पाटील, भटू पाटील, किशोर मासुळे, रवींद्र वाघ, गणेश चौधरी, राहुल साकरे, सर्जेराव पाटील, साहेबराव पाटील, पुंडलिक पाटील, पंडित भावसार, अविनाश पाटील, प्रकाश पाटील, शरद यादवराव पाटील, भटू गिरासे, भाऊसाहेब शालीग्राम पाटील, दाजभाऊ भौर, संदीप अनिल पाटील, प्रवीण थोरात, संतोष बाबरे, सतीश नारायण खंदळे, पंकज चव्हाण, अमोल भामरे, मुकेश पाटील, प्रशांत पाटील, नवीद शेख, कैलास पकर, विशाल एस. ठाकरे, प्रमोद जैन, संतोष पाटील, कमलाकर शांताराम गर्दे, विजय भगवान ठाकरे, गौतम खैरनार, भैय्या बडगुजर, ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी आहीरे, एम. एल. पाटील, ज्ञानेश्वर मराठे, जगन्नाथ बागुल, पृथ्वीराज पाटील, सुनील अहिरे, निलेश पाटील, सुभाष पाटील, दीपक गुजराती, ॲड. बी. जी. पाटील, राकेश पाटील, नितीन शिंदे, सदानंद पाटील, अशोक पाटील, दिलीप बिरारी, रवींद्र खैरनार, मच्छिंद्र बडगुजर, विजय पाटील, दादाजी मोरे, सुनिल सोनवणे, साहेबराव खेरनार, विजय पाटील, डॉ. चंद्रकांत राजपूत, सुरेखा बडगुजर, अर्चना उमाकांत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.