आमदारांनी आणला आणखी पाच कोटी रुपयांचा निधी
धुळे : महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजने अंतर्गत निधी मिळावा यासाठी आमदार फारुख शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. आ. फारुख शाह यांच्या मागणीचा विचार करून धुळे शहर मतदार संघासाठी महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागातील रस्ते आणि गटारी करण्यासाठी नागरविकास विभााच्यावतीने पाच कोटी सहा लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
निव्वळ एकच ध्यास धुळे शहराचा विकास हे ब्रीद घेऊन आ. फारुख शाह हे गेल्या चार वर्षापासून राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी शहरासाठी आणून विकासकामे करीत आहेत. आपल्याकडे आलेल्या धुळे शहरातील नागरिकांच्या समस्या कशा मार्गी लावता येतील याबद्दलचं सातत्याने चिंतन करीत असल्यामुळे शहराचा विकासाचा मार्ग सोपा आणि सुकर होत असल्याचा अनुभव आ. फारुख शाह यांचा राहिलेला आहे. त्यामुळे आमदार कार्यालयात येणा- या तक्रारींचा प्राधान्याने विचार, विकासकामे मंजूर करताना केला जातो. त्यानुसार सुचविण्यात आलेल्या कामांना दिनांक 29 ऑगस्ट 2023 च्या शासन निर्णयानुसार मंजुरी प्राप्त झाली असून ती कामे खालील प्रमाणे आहेत:-
प्रभाग क्र. १९ मध्ये अविष्कार कॉलनी, गल्ली नं. ३ व ४ येथे समीरभाई यांच्या घरापासून मिस. नाहीद यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता करणे, प्रभाग क्र. १९ मध्ये वडजाई रोड फैझ फिटनेस ते हाफिज साहेब यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता करणे. प्रभाग क्र. ८ मध्ये जलील सुतवालापासून ते मिना अलिशानपर्यंत रस्ता तयार करणे., प्रभाग क्र. ५ योगेश्वर कॉलनी सुरेश देव यांचे घरापासून ते सुभाष येवले यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता करणे. प्रभाग क्र. १३ मध्ये मिना अलिशान ते कल्याण शेठ यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता करणे, प्रभाग क्र. १९ मध्ये आसीम खान यांच्या घरापासून ते A to Z किराणा ते आबिदभाई यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता करणे, प्रभाग क्र.१२ मध्ये मिल्लत नगर, डॉ. शकील यांच्या घरापासून ते सलीम भाई यांच्या घरापर्यंत तसेच पप्पूभाई यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे. प्रभाग क्र.१९ भागीरथी पेट्रोल पंप ते साजिद पेंटर यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता व गटार करणे. प्रभाग क्र. १९ बोरसे कॉलनी भागात तिरंगा सायजीन पासून ते डॉ. शेख यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता करणे., प्रभाग क्र. ०३ शब्बीर बंगारवाला ते दुर्गामाता मंदिर पर्यंत कॉंक्रीट रस्ता व गटार करणे, प्रभाग क्र. १३ जयशंकर कॉलनी फायनल प्लॉट नं ७९/ब१ येथे कुंपण भिंत बांधणे., प्रभाग क्र.१९ हाफिज सिद्धिकी नगर येथे गटार व रस्ता कॉंक्रीट रस्ता करणे., प्रभाग क्र. ०३ मध्ये सलीम शेख यांचा घरापासून ते अफसर पठान यांचा घरा पर्यंत रस्ता कॉंक्रीट करणे, प्रभाग क्र १४ मध्ये पांडव प्लाझा समोरील ८० फुटी रोड ते स्टेशन रोड पर्यंत डांबरीकरण करणे., प्रभाग क्र.२ श्रीकृष्ण व हजारे कॉलनीतील रस्ते कॉंक्रीटीकरण करणे, अबुल हुसेन नगर सर्व्हे क्र.४३३/२,४३४ मधील आझम भाई यांचे घरापासून ते कौसर शाह ते राजू पिंजारी ते शेख उल कबीर मस्जिद पर्यंत रस्ता कॉंक्रीट करणे,प्रभाग क्र.१९ गजानन कॉलनी पूर्व हुडको येथील रस्ते कॉंक्रीट करणे., प्रभाग क्र.१२ मणियार कॉलनी मोहसीन भाई यांच्या घरापासून ते कुल्फी कारखाना पर्यंत रस्ता कॉंक्रीट करणे व पथदिवे बसविणे., प्रभाग क्र.१९ मदनीपूरा अंतर्गत गटार व रस्ते कॉंक्रीट करणे, प्रभाग क्र.०३ येथील अंतर्गत रस्ते कॉंक्रीट करणे.
धुळे महानगरपालिका धुळे यंत्रणा असलेल्या या कामांच्या बाबतीत अंदाजपत्रके व इतर प्रशासकीय बाबी पूर्ण करून लवकरच कामांना सुरुवात केली जाणार आहे.