धुळ्यातील दहीहंडी उत्सवात मंत्री गिरीश महाजन भन्नाट नाचले
धुळे : दहीहंडी उत्सव धुळे शहरात यंदाही जल्लोषात साजरा झाला. यंदाच्या दहीहंडीचे मुख्य आकर्षण ठरले पालकमंत्री गिरीश महाजन. त्यांनी केलेल्या नृत्याने धुळेकरांची मने जिंकली.
शहरातील गरुड मैदानावर श्रीकृष्ण सांस्कृतिक मित्र मंडळाने आयोजित केलेल्या दहीहंडीला ग्रामविकास मंत्री व धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. यावेळी सुरू असलेल्या डिजेच्या तालावर नाचण्याचा मोह मंत्री महाजन यांना आवरता आला नाही. यावेळी व्यासपीठावर उपस्थित खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री जयकुमार रावल व इतर मान्यवरांनीही मंत्री महाजन यांच्यासोबत ठेका धरला.