कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया नेमकी काय आहे? जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून
धुळे : सांधे दुखीच्या आजाराने त्रस्त आहात म्हणून सांधेरोपण करायचे आहे?, पुणे-मुंबईची वारी टाळायची आणि खर्चातही बचत करायची असेल तर आता सर्वोत्तम पर्याय धुळ्यातच उपलब्ध आहे. नकाने रोडवरील छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सांधेरोपणाची शस्त्रक्रिया आता निम्म्या खर्चात केल्या जात आहेत. आतापर्यंत २०० हून अधिक कृत्रिम सांधेरोपणाच्या शस्त्रक्रिया धुळ्यातील भूमिपुत्र डॉ. अमोल खैरनार यांनी केल्या असून, अत्यंत माफक खर्चात छत्रपती दवाखान्यात सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहिती डॉ. खैरनार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. अमोल खैरनार म्हणाले की, मुंबईला एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण चेन्नई येथे घेतले. त्यानंतर जर्मनीमध्ये स्पेशल ट्रेनिंग घेतली. आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग आपल्याच मातीतील माणसांना व्हावा यासाठी मी धुळ्यात आलो. धुळे जिल्हा रुग्णालयात सांधेरोपणाची पहिली शस्त्रक्रिया बारा वर्षांपूर्वी केली. आतापर्यंत २०० हून अधिक सांधे रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शस्त्रक्रिया अवघड असतात. खर्च चार ते पाच लाख रुपये लागतो. त्यासाठी मुंबई- पुण्याला जावे लागते हा केवळ समज आहे. या शस्त्रक्रिया धुळ्यातही होऊ शकतात.
वयामुळे संधीवात आणि इतर कारणांमुळे आपले सांधे घासले जातात. तेव्हा शस्त्रक्रियेची गरज भासते. या शस्त्रक्रियेमध्ये इम्पोर्टेड जॉइंट वापरला जातो. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्ण चालायला लागतो. तीन दिवसानंतर आम्ही रुग्णाला घरी पाठवतो. घरी गेल्यानंतर रुग्णाला फिजिओ थेअरीपीची गरज भासत नाही. कृत्रिम सांध्याचा टिकण्याचा कालावधी १५ ते २० वर्ष असतो त्यामध्ये सिमेंटलेस, सिमेंटटेड, सिरॅमिक असे प्रकार आहेत. शस्त्रक्रियेनंतर इन्फेक्शन म्हणजे संसर्गाची शक्यता अवघी १ ते २ टक्के असते.
कोरोना काळात धुळेकरांची गरज लक्षात घेवून एका विचारांच्या आम्ही डॉक्टरांनी हे रुग्णालय सुरू केले. शंभर बेडची सुविधा असलेले २० बेडचे आयसीयु छत्रपती दवाखान्यात आहे. न्युरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कॉमेस्टिक सर्जरी, ब्रेन स्पाईन सर्जरी देखिल येथे होतात. श्री छत्रपतीमध्ये आतापर्यंत खुब्याचे ८, दोन्ही सांध्याचे, गुडघ्याचे जवळपास २५ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याची माहितीही डॉ.अमोल खैरनार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. विजयकुमार व्ही, डॉ. रोहन निंबाळकर, डॉ. भूपेश पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. महेंद्र गिरासे, भारत राजपूत उपस्थित होते.