तरुणांनो, आत्महत्या करायचा विचार करताय? आधी हे वाचा… मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश मेहरा यांचा विशेष लेख
आज 10 सप्टेंबर. आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश मेहरा आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगावकर यांनी जनजागृतीसाठी लिहिलेला हा विशेष लेख…
जगभरात दरवर्षी सात दशलक्ष लोक आत्महत्या करतात. यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात.
तरुणांमध्ये मृत्युच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण आत्महत्या आहे. नैराश्य, असहायता आणि आयुष्यात काहीच न करू शकल्याच्या नैराश्यातून लोक आत्महत्या करतात. याशिवाय आत्महत्या करण्यामागे वैद्यकीय कारणेही असू शकतात.
आत्महत्या प्रतिबंध दिन : आत्महत्येशी संबंधित सात प्रश्नांची उत्तरे
1. लोक आत्महत्येचा विचार का करतात?
जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करू लागते, तेव्हा या अवस्थेला आत्महत्येचा विचार म्हणतात. हे कोणत्याही एका कारणाने झालेच पाहिजे असे नाही. माझ्या मते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही अडचणीतून मार्ग सापडत नाही, तेव्हा तो आपले जीवन संपविण्याचा विचार करतो.
“असे लोक विचार करू लागतात की आता आयुष्यात काहीच उरले नाही.”
यामुळेच नैराश्यग्रस्त लोकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.
“आत्महत्येचा विचार नैसर्गिक नाही. मेंदूतील बायो-न्यूरोलॉजिकल बदलांमुळे, लोकांना आयुष्य काही उपयोगाचे नाही, असे वाटू लागते. त्यानंतर आत्महत्येचा विचार येतो. “प्रकरणांची टक्केवारी मानसिक विकारांमुळे आहेत.”
नैराश्यग्रस्त लोक जगाला नेहमीच नकारात्मकतेने पाहतात, ते प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मकतेने पाहू लागतात.
2. आत्महत्येचे विचार येण्याची चिन्हे कोणती आहेत?
ज्या लोकांच्या वर्तनात अशी चिन्हे दिसतात त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार असू शकतात.
कमी आर्थिक उत्पन्न, स्पर्धा, अभ्यासात मागे पडणे, नोकरी मिळण्यात अपयश, नैराश्य, मानसिक स्थितीची अस्थिरता येणे, चिंता आणि अस्वस्थता येणे, तुम्हाला आनंद देणार्या एखाद्या गोष्टीत रस कमी येणे, नकारात्मक गोष्टी नेहमी येणे, भविष्याबद्दल नकारात्मक दृष्टीकोन असणे
3. जेव्हा लोक मानसिक विकाराच्या पकडीत असतात तेव्हा त्यांच्यात कोणते बदल दिसून येतात?
जे लोक नेहमी हसतमुख किंवा इतर लोकांमध्ये सहज मिसळून जातात, त्यांनाही मानसिक विकार जडल्यानंतर अचानक एकटेपणा जाणवतो.
मानसिक विकाराने ग्रस्त व्यक्ती जास्त प्रमाणात मद्यपान करू लागते. तो सर्व गोष्टींकडे नकारात्मक दृष्टीकोनातून बघू लागतो, जीवनाबद्दलचा निराशावादी दृष्टिकोन त्याच्यावर वर्चस्व गाजवू लागतो. तुमच्या आजूबाजूला कोणाच्या आयुष्यात असे बदल होत असतील तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
“आत्महत्येचा विचार असलेल्या सर्व लोकांमध्ये याची लक्षणे दिसणे आवश्यक नाही. ते जे बोलतात किंवा करतात त्यावरूनही ते स्पष्ट होऊ शकते.”
तथापि, लोक सहसा या गोष्टींबद्दल बोलत नाहीत. पण ते पुन्हा पुन्हा होऊ लागले तर ते धोक्याचे लक्षण मानले पाहिजे.
4. आत्महत्येचे विचार येत असल्यास काय करावे?
माणसाच्या मनात नकारात्मक विचार येणे स्वाभाविक आहे. कधीकधी असे विचार काही क्षणांसाठीच येतात, परंतु काही लोकांमध्ये ते हळूहळू वाढू लागतात.
मानसिक विकारांबद्दल अजूनही बरेच गैरसमज आहेत, त्यामुळे लोक त्याबद्दल फारसे बोलत नाहीत. अशा परिस्थितीत मानसिक समुपदेशन हेल्पलाइनची भूमिका महत्त्वाची आहे.
टेलीमानस टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक -१४४१६ कुणीही व्यक्ती २४ X ७ या सेवेचा लाभ घेऊ शकतो “अशा प्रकारची हेल्पलाइन अशा लोकांना मदत करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार आले तर लगेच मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे शक्य नसते. अशा वेळी हेल्पलाइनवर संपर्क साधुन मदतीचा हात घेता येतो.”
एखाद्या व्यक्तीमध्ये आत्महत्येचा विचार किती गंभीर आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी मानसिक आरोग्य समुपदेशन हेल्पलाइनची मदत घ्यावी किंवा डॉक्टरांना भेटावे.
“मानसिक विकार असलेले लोक जेव्हा आत्महत्येचे विचार करतात तेव्हा ते स्वतः व इतर लोकांचे नुकसान करू शकतात. म्हणूनच त्यांच्यावर त्वरित उपचार करणे महत्वाचे आहे.”
5. इतर कोणाला आत्महत्येचे विचार येत असतील तर काय करावे?
तुमच्या जवळच्या व्यक्तीला आत्महत्या करायची आहे असे सांगितल्यावर तुम्ही काय कराल? तुम्ही परिस्थिती कशी हाताळाल? हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल.
यासंदर्भात काही टिप्स –
अशा लोकांसोबत बसून शांतपणे त्यांचे ऐकले पाहिजे.
तो आपले विचार मोकळेपणाने मांडू शकेल इतक्या आत्मीयतेने बोलले पाहिजे.
त्यांचे म्हणणे शांतपणे ऐका आणि कोणत्याही निष्कर्षावर जाऊ नका.
त्यांच्या समस्या समजून घ्या आणि स्वीकारा.
ही समस्या नाही असे म्हणू नका.
त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
येथे हे समजून घेणे आवश्यक आहे की मानसिक विकार असलेल्या लोकांसाठी कौटुंबिक आधार हा सर्वात महत्वाचा पैलू आहे. कुटुंबातील सदस्यांनीही कोणत्याही निष्कर्षावर जाऊ नये.
मानसिक विकार आणि आत्महत्येच्या विचारांवर किशोरवयीन मुलांशीही चर्चा केली पाहिजे. त्याबाबत कोणत्याही प्रकारची संकोच बाळगता कामा नये.
कुटुंबातील सदस्यांनी किंवा इतरांनी आत्महत्येचा विचार करत असलेल्या व्यक्तीला विचार न करता कोणताही सल्ला देऊ नये.
6. आत्महत्येच्या कल्पनेशी संबंधित गैरसमज काय आहेत?
आत्महत्या करण्याच्या कल्पनेशी संबंधित लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. एक गैरसमज असा आहे की जोपर्यंत परिस्थिती गंभीर होत नाही तोपर्यंत लोक आत्महत्येचा विचार करत नाहीत असा सर्वसाधारणपणे लोकांचा समज आहे.
“आत्महत्येचा विचार कधीही येऊ शकतो.”
यासंबंधीचे गैरसमज असे-
केवळ लक्ष वेधण्यासाठी आत्महत्येची चर्चा केली जात आहे.
आत्महत्येबद्दल बोलणे इतर लोकांना प्रेरणा देऊ शकते.
इतर लोक देखील आत्महत्या करण्याचा विचार करू शकतात.
पूर्णपणे बरे झालेले लोक आत्महत्येचा विचार करू शकत नाहीत.
“सामान्यत: हेल्पलाइनवरील लोक आत्महत्येबद्दल बोलत नाहीत. अशा परिस्थितीत हेल्पलाईन वरून थेट प्रश्न विचारला जातो कि, तुम्ही कधी आत्महत्या करण्याचा विचार केला आहे का? याचा अर्थ असा नाही की त्यांना आत्महत्येसाठी प्रोत्साहित करतो किंवा कल्पना देतो.
7. आत्महत्येच्या विचारांवर मात कशी करता येईल?
तुम्ही हेल्पलाइनची मदत घेऊ शकता. समुपदेशन, सकारात्मक विचार आणि वैद्यकीय मदतीमुळे तुम्ही नकारात्मक विचारांवर मात करू शकता.
“इलेक्ट्रोकॉनव्हल्सिव्ह (ECT) थेरपी खूप प्रभावी आहे. याला सामान्यतः शॉक थेरपी देखील म्हणतात.
तुम्ही कोणाला सांगू शकत नसाल तर तुम्ही त्याबद्दल लिहिण्यास प्रोत्साहन द्यावे
8. जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीने आत्महत्या केली तेव्हा हेल्पलाइनवर फोन कॉल्सची संख्या वाढते. असे का?
“जेव्हा एखादी प्रसिद्ध व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा लोक मदत घेण्याचा विचार करतात. आणि मग जेव्हा त्यांच्या मनात नकारात्मकता निर्माण होते, तेव्हा ते मदतीसाठी हाक मारतात.”
माझ्या मते , “कोविड महामारीच्या तीन ते चार महिन्यांनंतरही अनेकांनी हेल्पलाइनवर कॉल केले होते. व्यवसाय सुरू नसणे, घरातील भांडणे आणि आर्थिक संकट यामुळे लोकांना आत्महत्या करावीशी वाटली होती.”
आत्महत्या करणाऱ्यामध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. हृदयाशी संबंधित गंभीर आजारांमध्येही लोक आत्महत्या करतात, तर कौटुंबिक नात्यातील अडचणींमुळे महिला अधिक आत्महत्या करतात.
– डॉ. हरिष मेहरा, मानसोपचारतज्ञ, जिल्हा मानसिक आरोग्य कर्यक्रम, जिल्हा रुग्णालय धुळे
मानसिक ताण-तणाव, चिंता, उदासीनता, आत्महत्येचे विचार व सर्व प्रकारच्या मानसिक आजारांवर जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय धुळे येथे समुपदेशन व औषधोपचार निःशुल्क उपलब्ध असुन नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच ताणतणाव, चिंता, उदासीनता, आत्महत्येचे विचार व सर्व प्रकारच्या मानसिक समस्यासाठी टेलीमानस टोल फ्री क्रमांक -14416 या क्रमकांवर संपर्क साधून २४X७ मोफत समुपदेशन मिळवता येते.
– डॉ. दत्ता देगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा सामान्य रुग्णालय धुळे