ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास तीव्र आंदोलन, समता परिषदेचा इशारा
धुळे : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने दिला.
या संदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्हा शाखेचा मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. मराठा समाजातील गोरगरीब समूहाला आरक्षण मिळणे आवश्यकच आहे. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यास संपूर्ण ओबीसी समाज गावागावात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, भटू पगारे, अण्णा माळी, बापू महाजन, रवींद्र खैरनार, उमाकांत खलाणे, रवींद्र माळी, उमेश महाजन, गुलाब माळी, राजकिशोर तायडे, गोकुळ पाटील, रवींद्र पाटील,चेतन सौंदाणे, सोमेश्वर खलाने, विशाल जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा