अंबिकानगर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा एमआयएम पक्षात प्रवेश
धुळे : अंबिका नगर येथील युवकांनी व नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचा धुळे शहरातील विकास कामांचे धडाका बघून एमआयएम (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला.
धुळे शहरातील अंबिकानगरात सुमारे 40 वर्षापासूनची लोकवस्ती असून तेथे आजपर्यंत कोणत्याच आमदारांनी एक रुपयाचेसुद्धा काम केलेले नव्हते. हा भाग पूर्णपणे विकासकामापासून वंचित होता. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी रस्ते, गटारी, लाईट, पाण्याची पाईपलाईन या संदर्भात आमदार फारुख शाह यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने आमदार फारुख शाह यांनी चार वर्षात सुमारे दहा ते पंधरा करोड रुपयेचे कामे या भागात केले. कामाचा धडाका पाहून या भागातील नागरिकांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. पक्षासाठी यापुढे काम करणार असल्याची ग्वाही दिली.
अंबिकानगरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात फारुख शाह यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, धुळे शहरातील नागरिकांचा विकास हाच माझा ध्यास राहिलेला आहे व पुढे सुद्धा राहणार आहे. धुळे शहरातील नागरिकांसाठी रेशन कार्डची समस्या असो, अन्नधान्याची समस्या असो, संजय गांधी निराधारच्या महिलांच्या समस्या असो व विकास काम संदर्भात मी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. यापुढे सुद्धा करणार. निवडणुकीच्या वेळेस कित्येक लोक येतील व खोटी आश्वासन देऊन जातील. परंतु मी जे सांगितले त्याच्यापेक्षा दुप्पटीने शहराच्या विकासासाठी काम केले आहे.
अंबिकानगर एमआयएम पक्षाचा बोर्डाचे उद्घाटन आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या भागातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आमदार शाह यांचा अंबिका नगरासियांच्या वतीने आसिफ अन्सारी, आरिफ सैय्यद, रज्जाक पठाण, वसिम पठाण यांनी सत्कार केला. शफीभाई मंडपवाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात युवक कार्यकर्ते नजर पठाण यांनी झंझावती मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजाज सैय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन कैसर अहमद यांनी केले. यावेळी मंचावर मौलाना समसुल आरफिन, सलीम शाह, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक आमिर पठाण, मौलाना शकील, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, सुफी हाजी, छोटू मच्छीवाले, रफिक पठाण, सादिक शाह, रिझवान अन्सारी,यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आसिफ शाह, परवेज शाह, शाहिद शाह, रफिक काझी, जुबेर शेख, मोहम्मद शाहिद ,बाबुभाई मोबीन अहमद, मुक्तार तांबोळी, शफिक सय्यद, अब्दुल शकूर शाह, मोहम्मदकुमार सरदार, शराफत पठाण, सादिक खान, माजीद मनियार, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सरफराज अन्सारी, इमाम रगारी, जमाल रंगारी, रौफ खान, अजीज शाह, समीर खान, सउद आलम, शहजाद मन्सुरी, मोईन शेख यांनी प्रयत्न केले.