‘जिगरा’मध्ये आलिया भट ‘ॲक्शन मोड’मध्ये
मुंबई : आलिया भट्टने तिच्या ‘जिगरा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून मोशन पोस्टरही शेअर केले आहे. ‘जिगरा’ची निर्मिती आलियाने धर्मा प्रॉडक्शनसोबत केली असून २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. ‘जिगरा’मध्ये भाऊ-बहिणीच्या प्रेमाची कहाणी असल्याचे व्हिडिओवरुन जाणवते.
आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘जिगरा’चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात आलिया पहिल्यांदाच अॅक्शन अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक वासन बाला असतील. जिगरा हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. आलियाने धर्मा प्रोडक्शनच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता आलिया करण जोहरसोबत तिचा ‘जिगरा’ चित्रपट को-प्रोड्यूस करणार आहे.
आलिया भट्टने अलीकडेच ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्रीच्या भूमिकेत गॅल गडॉट दिसली. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यानंतर नुकताच आलिया भट्टचा रॉकी और रानी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात आलियासोबत रणवीर सिंग दिसला होता. हा चित्रपट रोमान्स आणि कॉमेडीने भरलेला होता.
तिने ट्विटरवर ‘जिगरा’ ची घोषणा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “‘जिगरा’ चित्रपट सादर करत आहे. याचं दिग्दर्शन सुप्रसिद्ध वासन बाला करणार आहेत. तर धर्मा प्रोडक्शन आणि इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन्स त्याची निर्मिती करणार आहेत. धर्मा प्रॉडक्शनसोबत पदार्पण करण्यापासून ते आता त्यांच्यासोबत एक चित्रपट तयार करण्यापर्यंत, अनेक मार्गांनी माझे आयुष्य पूर्ण झाले आहे.
‘जिगरा’ हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय आलिया भट्टकडे ‘जी ले जरा’ हा चित्रपटही आहे, ज्यामध्ये कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्याही भूमिका आहेत. मात्र, प्रियांकामुळे चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल सध्या रखडले आहे. २०२३ हे वर्ष आलियासाठी खूप चांगले गेले. या वर्षी तिचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि तिला ‘गंगूबाई काठियावाडी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.