पुणे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकीलीला ५ जुलै २०२३ रोजी १०० वर्षे पुर्ण झाली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव दाभाडे पुणे यांच्या मार्फत विधायक समाजकार्य, संविधानिक वकिली, धम्मकार्य करणाऱ्या देशपातळीवरील शंभर वकीलांना ‘संविधान रत्न’ हा मानाचा पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी पुणे येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यात झाला. सदर पुरस्कार व सन्मानासाठी देशभरातील 100 वकीलांची निवड करण्यात आली होती. त्या 100 सन्माननीय वकीलांमध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून शिरपूर येथील ॲड. जितेंद्र भाईदास पवार यांची निवड करण्यात आली. पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
दरम्यान, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड. जितेंद्र पवार यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.