धुळे जिल्ह्यात कोतवाल 64, पोलीस पाटील 129 जागांची भरती
धुळे : जिल्ह्यात कोतवालच्या चौसष्ट आणि पोलीस पाटीलच्या 129 जागांची भरती जिल्हाधिकारी कार्यालयाने काढली आहे. धुळे व शिरपूर उपविभागांतर्गत कोतवाल व पोलीस पाटील यांची रिक्तपदे भरतीसाठी 4 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
रिक्त पदांचा तपशील असा : कोतवाल भरतीसाठी धुळे तालुक्यातील 14, साक्री तालुक्यातील 7, शिरपूर तालुक्यातील 22 तर शिंदखेडा तालुक्यातील 31 रिक्त पदाचा समावेश आहे. तर पोलीस पाटील पदासाठी धुळे उपविभागातील 77 तर शिरपूर उपविभागातील 52 पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या संकेतस्थळावर करा अर्ज : कोतवाल पदासाठी https://dhulekotwal.mahbharti. com या संकेतस्थळावर आणि पोलीस पाटील पदासाठी https://ppdhule.mahabharti.com या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करता येईल. भरतीकरिता परिक्षा शुल्क हे नमुद संकेतस्थळांवर दिलेल्या प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे.
अधिक माहिती खालील संकेतस्थळावर : रिक्तपदाची सजा निहाय, गाव निहाय तसेच पदाचे आरक्षण बाबत सविस्तर माहिती, पदासाठीच्या अटी शर्ती, पात्रता तसेच अर्ज करण्याच्या पद्धतीची माहिती धुळे जिल्ह्याच्या https://dhule.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ही जाहिरात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय, गाव चावडी येथे देखील पाहता येईल.
उमेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपुर्वक बघुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाही. तसेच संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील, असे जिल्हाधिकारी गोयल यांनी कळविले आहे.