जिल्हाधिकारी मनीषा खत्री शेतकऱ्यांच्या बांधावर
नंदुरबार (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे पिकांचे नुकसान झाले असून, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
मनीषा खत्री यांनी सांगितले की, 36 मंडळांपैकी 12 मंडळांमध्ये पर्जन्यमान फारच कमी आहे. तसेच पावसाचा 21 दिवसांपेक्षा जास्त खंड पडला आहे. पिकांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. ई-पीक पाहाणी केल्यास विम्याची रक्कम मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही. संभाव्य टंचाईमुळे उत्पन्न कमी येणार असल्याने आपल्याला आता विमा हाच एकमात्र पर्याय आहे आणि त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. तसेच संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्यांसाठी प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.