देवपूर स्मशानभूमीची दुरवस्था, आमदारांनी दिला २० लाखांचा निधी
धुळे : शहरातील देवपूर स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, स्मशानभूमीच्या दुरूस्तीसाठी आमदार फारुख शाह यांनी 20 लाखांचा निधी दिला. निधी मंजुरीचे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले.
शहरातील देवपूर येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दहन ओट्यांची अवस्था फारच वाईट आहे. ओट्यावरील लोखंडी जाळी, रेलिंग तुटलेली आहे. त्यामुळे मृतदेहांना अग्निडाग देताना अनेक समस्या निर्माण होतात. सरण रचताना मृतदेह पडेल की काय अशा प्रकारची भीती नागरिकांमध्ये असते. या संदर्भात वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार फारुख शाह यांनी शुक्रवारी देवपूर स्मशानभूमीची पाहणी केली. देवपूर स्मशानभूमितील ओट्यांची अवस्था पाहून आमदार फारुख शाह यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 20 लाख रुपयांचा निधी तातडीने दिला आणि तसे पत्र आयुक्त अमिता दगडे-पाटील यांना सुपूर्त केले.
यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील, शहर अभियंता कैलास शिंदे, विद्युत विभागाचे उपअभियंता नरेंद्र बागुल, नगरसेवक नासीर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गणी डॉलर, कैसर अहमद, शहजाद मंसूरी, जुबेर खान, अशोक मराठे, दीपक माळी, संतोष गवळी, हर्षल माळी, नाना माळी, तुषार चौधरी, पंकज गुरव, अनिल मराठे आदी उपस्थित होते.