भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी विद्याधर पाटील
धुळे : धुळे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी विद्याधर अभिमन पाटील खोरदड ता. जि. धुळे यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा हस्ते विद्याधर पाटील यांना शिरपूर येथे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा निवासस्थानी (दि. ११ रोजी) नियुक्ती पत्र देण्यात आले.
धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी नियुक्ती जाहिर केली. नियुक्ती पत्र देतेवेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, भाजपा उत्तर महाराष्ट्र विभाग संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांचा प्रमुख उपस्थित विद्याधर पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
बबनराव चौधरी यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपण मागील काळात किसान मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यात यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली आहे. त्याची दखल घेवून पुन्हा आपली नियुक्ती करण्यात येत आहे. आपण पक्ष संघटना वाढीसाठी कार्यरत आहात. आपल्या सामाजिक व संघटनात्मक अनुभवाचा उपयोग पक्षवाढीसाठी निश्चितपणे होईल. आपण ही जबाबदारी सर्वाना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडाल, असा विश्वास आहे, असे म्हटले आहे.
याप्रसंगी बोंदगाव सरपंच अविनाश पाटील, मोरदाड तांडा सरपंच नवल पवार, काळखेडा माजी सरपंच जिजाबराव पाटील, निमगुळचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप सुर्यवंशी उपस्थित होते.