काकाने केली प्राॅपर्टीत हेराफेरी : अभिजीत साळुंखे
धुळे : जयहिंद शाळेमागील प्लॉट न ५५ मधील वारसदार काकांनी त्यांना धरून दोंघा भावा व्यतिरिक्त इतर नातलगांना विश्वासात न घेता खोटी कागदपत्रे तयार केली आजमितीस गुंडा करवी धाक दाखवीत जागा खाली करण्याकरीता दमदाटी करीत आल्याचा आरोप अभिजीत रामराव साळुंखे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केला. या पत्रपरिषदेला अभिजीत साळुंखे यांचेसह त्यांची आई, पत्नी अर्चना व मुलगी उपस्थित होत्या.
अभिजीत साळुंखे म्हणाले की, आजोबा गजमल लकडू पाटील यांचे नाव असलेला ५ हजार ८२० चौरस फुटचा जयहिंद शाळेमागील प्लॉट त्यांचे काका शामराव गजमल साळुंखे यांनी काही दिवसांपूर्वी खोटी कागदपत्रे करून अर्धा प्लॉट त्यांच्या आईच्या नावे केला. मात्र आईला यावेळी त्यांनी कसलीही माहिती दिली नाही. तसेच वडिलांच्या बहिणींना देखील विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आजमीतीस त्या प्लॉटसह इतर प्रॉपर्टी संदर्भात रीतसर बैठक घेवून कायद्याच्या चौकटीत राहून काम करून घेण्याची आम्ही त्यांना विनंती केली असता ते दादागिरीवर उतरले आहेत.
काही दिवसापूर्वी २० ते २५ गुंडांकरवी त्यांनी घरांचे कुलपे तोडून दमबाजी केली. पोलीस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी देखील या गंभीर प्रकारची दखल न घेता आपसात बसवून प्रकरण सोडविण्याचे दोघा पार्टींना सांगितले. काका शामराव साळुंखे यांनी केलेले कागदपत्रांची नोंद बघितली असता त्यांनी केवळ १८ दिवसात सदरच्या प्लॉटची कागदपत्रे तयार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याप्रकरणी आम्हाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा असल्याचे अभिजीत साळुंखे म्हणाले.