वाढदिवसानिमित्त होणारा बॅनरबाजीसारखा वायफळ खर्च टाळून रक्तदान शिबिर घेतल्याने सारांश भावसार यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.धुळ्यात देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मंत्री छगन भुजबळांच्या वाढदिवसाला धुळ्यात शंभर दात्यांचे रक्तदान
धुळे : मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी धुळे शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 100 दात्यांनी रक्तदान केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांच्या पुढाकाराने रुग्णसेवेचा हा उपक्रम पार पडला.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांच्या पुढाकाराने लळिंग टोल प्लाझा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शंभर दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या युवकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
रक्तदान शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, राष्ट्रवादीचे किरण शिंदे, ज्ञानेश्वर भामरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार, राजेंद्र शिंदे, मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुमित पवार, शहराध्यक्ष कुणाल पवार, सत्यजित सिसोदे, रवींद्र आघाव, गणेश जाधव, मयूर पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.