शुभम साळुंखे खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना अटक करा!
धुळे : शहरातील आठ ऑक्टोबरला शुभम साळुंखे या मराठा तरुणाचा निर्घूण खून करण्यात आला. अटक केलेल्या त्याच्या मारेकऱ्यांसह मुख्य सुत्रधार असलेल्या संशयित गुन्हेगारांना शोधून सर्वांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, सदरचा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पोलिसांकडे केली.
संशयित गुन्हेगारांचे आणि शुभमचे सहा महिन्यांचे कॉल डिटेल्स तपासून कोणत्याही गुन्हेगारांना दयामया न दाखवता पीडित तरुणाला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा मराठा क्रांती मोर्चा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांना निवेदन दिले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव, पत्रकार निंबा मराठे, अर्जुन पाटील, जगन ताकटे, ॲड. नितीन पाटील, मनोज ढवळे, बबलू पाटील, पत्रकार वीरेंद्र मोरे, रवींद्र मराठे, बाळू गायकवाड, प्रफुल्ल माने, विनोद जगताप, पप्पू जाधव, भूषण बागुल, किरण जाधव, संजय नागणे, अमर फरताडे, माधुरी मराठे, कल्पनाबाई कदमबांडे, दीपिका मराठे, शीतल मराठे, विनायक साळुंखे, संदीप सूर्यवंशी, शरद पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा
Comments 1