पारोळा येथे मेरी पॉलिसी मेरे हाथ या उपक्रमाचे आयोजन
पारोळा : एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया च्या वतीने प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची विमा पॉलिसी घरपोच देण्याकरिता मेरी पॉलिसी मेरे हाथ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते विमा पॉलिसी वितरण करण्यात आले. तसेच आमदार स्वत: शेतकरी असुन त्याना पण विमा पॉलिसी वितरण करण्यात आले.
या वेळी परिसरातील शेतकरी बांधव व भारतीय कृषी बिमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी मिलिंद वाघ उपस्थित होते.