मुद्रांक विक्रेते, दस्तलेखकांवर अन्याय केल्यास आझाद मैदानावर बिऱ्हाड आंदोलन : दिलीप देवरे
धुळे : सातारा येथे 14 ऑक्टोबर रोजी मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक त्यांची राज्यस्तरीय बैठक झाली. बैठकीत शासनाच्या वतीने मुद्रांक विक्रेत्यांना हद्दपार करण्याचा डाव आहे. सदर डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे पत्रक मुद्रांक विक्रेता संघटना कार्याध्यक्ष दिलीप देवरे यांनी केले आहे.
आधीच शासनाने 1000 ते 20000 पर्यंतचे स्टॅम्प बंद केले आहेत. विक्री मर्यादा कमी केली आहे. आता फक्त 100 व 500 चे स्टॅम्प सुरु आहेत. ते सुध्दा बंद करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. त्यास आमचा विरोध आहे. मुद्रांक विक्री बंद केल्यास महाराष्ट्रातील 3500 मुद्रांक विक्रेते व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. शासनाने मुद्रांक विक्रेत्यांचा अंत पाहू नये, असा कुठलाही निर्णय घेऊ नये. अन्यथा महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते आपल्या कुटुंबासहीत आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत बिन्हाड आंदोलन करेल, असेही दिलीप देवरे म्हणाले.
बैठकीत दिलीप देवरे, शंकर मिसे, दिपक तावडे, राहुल नाईक, कल्याणराव बाबर, तन्वीरभाऊ, शंकर यादव, वासुदेवभाऊ यांनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीस महाराष्ट्रातून असंख्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक उपस्थित होते.