शुभम साळुंखे खून प्रकरणातील संशयितांना मोक्का लावणार
धुळे : शहरातील शुभम साळुंखे खून प्रकरणातील संशयितांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी येत्या दोन दिवसात विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, या गुन्ह्यातील अन्य संशयित विनोद थोरात, हर्षल चौधरी आणि शरद या तिघांना पकडण्यासाठी एलसीबीची दोन पथके आणि इतर एक अशी तीन पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना केल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा