बहुजन समाज पार्टीतर्फे 23 रोजी आरक्षण हक्क परिषद
धुळे : बहुजन समाज पार्टीच्या धुळे शहर आणि धुळे ग्रामीण विधानसभेच्या वतीने एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे शहरात गरूड वाचनालय येथे 23 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता परिषदेला सुरूवात होईल.
बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धुळ्यात परिषद होत आहे.
बसपाचे राष्ट्रीय महासचिव तथा राज्याचे प्रभारी माजी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने, राज्याचे नेते रवींद्र गवई, प्रदेश महासचिव रमेश निकम, जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाणे, जिल्हा प्रभारी मिलिंद बैसाणे, प्रा. रमेश अहिरे, गोविंद कांबळे, प्रदीप शिरसाठ, संतोष मोरे, विजय भामरे, विजयराव मोरे, संगम बागुल यांची प्रमुख उपस्थिती असेल.
परिषदेचा उद्देश काय?
आरक्षण हक्क परिषद घेण्याचा मुख्य उद्देश हा आहे की, दलित, आदिवासी, ओबीसी समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात हक्क, अधिकार बहाल केले आहेत. आपल्या संविधानिक अधिकारांची आणि संविधानाची जाण करून देण्यासाठी ही परिषद भरविण्यात आली आहे.
परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन धुळे विधानसभा प्रभारी सुनील बैसाणे, प्रकाश दाभाडे, ॲड. सतिष अहिरे, आकाश सोनार, ॲड. कृष्णा निमगडे, ॲड. संदिप जावरे, ॲड. मिलिंद बाविस्कर, रमेश बैसाणे, ईश्वर जाधव, अकबर पिंजारी, सुपडू मोरे, राकेश खैरनार, सागर भामरे, दादाजी साळवे, ईश्वर साळवे, देवेंद्र जाधव, गौतम मोरे, नाना साळवे, प्रशिक भामरे आदींनी केले आहे.