ललित पाटील ड्रग्स प्रकरणात डीआयजी बी. जी. शेखर पाटील यांचा हात असल्याच्या तक्रारी
धुळे : राज्यभर गाजत असलेल्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचाही हात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी शनिवारी धुळ्यात दिली.
धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील सांगवी हिंसाचार प्रकरणी तेथील पीडित आदिवासींनी आपल्याकडे सविस्तर निवेदन दिल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पोटतिडकीने प्रयत्न करू करू, असेही आमदारांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
धुळे शहरात अन्सारनगरात एका जलकुंभ कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. धुळे शहरात वाढत्या गुन्हेगारीची डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार असल्याचे आपण सांगितले होते. पण तशी चौकशी झाली की नाही याबाबत प्रश्न विचारला असता, आमदार फारुख शाह म्हणाले, गेल्या अधिवेशनात आंदोलन केल्यानंतर डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत धुळे शहरातील गुन्हेगारी प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले होते दिले होते. परंतु अद्यापपावतो कोणतीही चौकशी झालेली नाही. कारण चौकशीसाठी नियुक्त केलेले अधिकारी बी. जी. शेखर पाटील यांनी चौकशीच केली नाही. यासंदर्भात आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.
तसेच ड्रग्स प्रकरणामध्ये डीआयजी बी. जी. शेखर पाटील यांचा हात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, याबाबतही आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, असे आमदारांनी सांगितले.
हेही वाचा
सांगवी हिंसाचाराच्या सीबीआय चौकशीची मागणी
गुंडगिरी माजविणाऱ्या सजन चौधरीचा बंदोबस्त करा!
शुभम साळुंखे खून प्रकरणातील सहा संशयितांना अटक
शुभम साळुंखे खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना अटक करा!
शुभम साळुंखे खून प्रकरणातील संशयितांना मोक्का लावणार
बापरे! कपाशीच्या शेतात तब्बल एक कोटींचा गांजा!!
नगरसेविका पुत्राचा तरूणावर प्राणघातक हल्ला
धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !
अन्सारनगर जलकुंभ कामाचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ
धुळे शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या मौलवी गंज, दिलदारनगर, अन्सारनगर, अन्सारनगर, तिरंगा चौक, फिरदोसनगर, शिवाजीनगर झोपडपट्टी, माधवपुरा, मच्छी बाजार व या भागातील हजारो नागरिकांची फार वर्षांपासून पाणीटंचाई संदर्भात जलकुंभाची मागणी होती.
या भागात पाणीपुरवठ्यासाठी एक मोठा जलकुंभ उभारावा. त्यामुळे या भागातील नागरिकांची पाणी समस्या दूर होईल. विविध पक्ष-संघटना आणि रहिवाशांनी केलेली मागणी आणि गरज लक्षात घेऊन आमदार फारूख शाह यांनी मूलभूत सुविधांच्या विकास योजना अंतर्गत अन्सारनगर येथे ओपन स्पेसवर जलकुंभ उभारण्यासाठी शासनाकडून एक कोटी 27 लाख रुपये मंजूर करून आणले. या कामाचा आमदारांच्या हस्ते शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आ. फारुख शाह यांच्या कामाबद्दल लोकांमध्ये समाधान आहे.
शहरातील प्रमुख समस्या असलेल्या अनेक मूलभूत सुख सुविधांच्या कामासाठी आ. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी नागरिकांच्या विकासासाठी आणलेला आहे. शहरातील सुशोभीकरण असो, पाणी समस्या असो, रस्ते, गटारी, स्मशानभूमीची समस्या असो, वेगवेगळ्या कामांसाठी आजपर्यंत आ. फारुख शाह यांनी निधी आणलेला आहे. शहराच्या विकासासाठी जे शक्य असेल ते सर्व करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहेत.
लवकरच जामचा मळा येथे एक मोठा अम्युझमेंट पार्कचा सुद्धा शुभारंभ होणार आहे. महिलांना आणि बालकांना विरंगुळ्यासाठी एक मोठा बगीचा उपलब्ध होणार आहे. शहरातील अनेक समस्यांना हात घालत फक्त विकासाने आपल्या कामाची प्रचिती आजपर्यंत आ. फारुख शाह यांनी धुळे शहरासाठी केलेली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाफिज रहेमान होते. मुक्ती कासिम जीलानी, माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी, ज्येष्ठ नगरसेवक साबीर खान, मुक्तार बिल्डर, इफ्तेकार अहमद, डॉ.अबुतुराब अन्सारी, शौकत हाजी, गुफरान पोपटवाले, युसुफ मुल्ला, नासिर पठाण, आमिर पठाण, गणी डॉलर, सईद बेग, गोपाल अन्सारी, शकील मेहंदी, मौलवी शकील, साजिद साई यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईलियास सर यांनी केले. तर सउद सरदार यांनी आभार मानले.