गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्नोफेस्टचे आयोजन
धुळे : गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालय नगाव येथे संगणक अभियांत्रिकी विभागामार्फत टेक्नो-फेस्ट 2023 या टेक्निकल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ब्लाइंड कम्प्युटिंग, रोबोरेस व पोस्टर प्रेझेंटेशन यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
टेक्नो-फेस्ट 2023 चा शुभारंभ संस्थेचे चेअरमन राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील होते. याप्रसंगी राम भदाणे यांनी सांगितले की, विद्यार्थी हा देशाचे भविष्य असून, त्यांच्यात प्रचंड ऊर्जा व क्षमता सामावलेली आहे. राष्ट्राच्या उभारणीसाठी त्याचा उपयोग करून देश एक समर्थ राष्ट्र म्हणून पुढे यायला वेळ लागणार नाही.
डिजिटलायझेशनच्या जागतिक मागणीची पूर्तता करण्यासाठी, विविध लँग्वेज ऑपरेशन्स, इंटरनेट आणि इतर डिजिटल तंत्रज्ञानात विविध प्रकारच्या क्षमता आणि अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विस्तार आणि भविष्यातील संधी विकसित करण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. व्ही. एम. पाटील केले.
या कार्यक्रमात ब्लाइंड गेम, ब्लाइंड कम्प्युटिंगसाठी 85 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. रोबो रेसमध्ये 22 तसेच संगणक क्षेत्रातील विविध विषयांवरील 36 पोस्टर प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांनी सादर केले.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून एस.एस.व्ही.पी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा. संगीता राजपूत यांनी काम पाहिले.
कार्यक्रमात प्रथम वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ब्लाईंड कम्प्युटिंग अंतर्गत विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, तांत्रिक कौशल्य, धैर्य व पूर्णतः कोडींगचे अद्यावत ज्ञान विद्यार्थ्यांना असावे याकरता ब्लाइंड कॉम्प्युटिंगची स्पर्धा घेण्यात आली.
पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये द्वितीय वर्षाचे विद्यार्थी ह्रितीक जगताप व स्नेहा चौधरी यांना प्रथम, प्रथम वर्षाची विदयार्थिनी वैष्णवी अनिल बोरसे हिला द्वितीय तर तृतीय वर्षाचे गौरव सोनवणे व मयुरी मराठे यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. जी. एम. पोदार व सहकारी यांनी केले. प्रा. तुषार धुमाळ, प्रा. महेश धाकड, प्रा. योगेश्वरी कोळपकर, प्रा. रीतीशा शेळके, विद्या जडे, हर्षदा पाटील. प्रा. सौ. अहिरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात सर्व विभाग प्रमुख आर. ओ. शेख, प्रा. विनोद पाटील, प्रा. डॉ. के. एम. जोशी. प्रा. राहुल पाटील, प्रा. हर्षल देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दीपक पाटील, रजिस्ट्रार प्रा. सारंग पाटील, विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.