21 ऑक्टोबर 1959 रोजी इंडो-चायना बॉर्डरवर भारतीय सिमा सुरक्षा दलाचे 10 जवान शहीद झाले होते. तेव्हापासुन 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून घोषीत करण्यात आला आहे.
कर्तव्य बजावताना वीरगती लाभलेले निमलष्करी अधिकारी, जवानांना धुळे पोलीस दलाची मानवंदना
धुळे : पोलीस स्मृती दिनाच्या निमीत्ताने धुळे येथे शनिवारी पोलीस कवायत मैदानावरीन स्मृतीस्थळ येथे स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन धुळे पोलीस दलाकडुन करण्यात आले होते. वर्षभरात 188 निमलष्करी अधिकारी व जवानांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या नावांचे वाचन करुन शोकाकुल वातावरणात स्मरण करण्यात आले.
वीरगती लाभलेले निमलष्करी अधिकारी व जवान यांना शासकीय नियमानुसार मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला शहीद जवानांच्या कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी स्मृतीदिनाचा इतिहास व महत्व सांगून जवानांचे स्मरण केले. तसेच जवानांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही असे उल्लेखीत केले.
धुळे पोलीस दलाकडुन 1022 राउंड हवेत फायर करुन सलामी देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते स्मृतीस्थळावर पुष्पवर्षाव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी शहीदांच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेवुन त्यांची विचारपुस केली तसेच तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.
पोलीस मुख्यालयात नवीन हुतात्मा स्मारकाच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. बांधकाम नियोजीत असल्याने आजची हुतात्मा स्मारकाजवळील परेड शेवटची परेड ठरु शकते. नवीन निर्माणाधीन हुतात्मा स्मारकाची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पाहणी करुन पोलीस अधीक्षक धुळे यांच्याकडुन माहीती घेतली.
पोलीस स्मृतीदिनाच्या कार्यक्रमासाठी न्या. आर. के. मलाबादे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, ), महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, एसआरपीएफ समादेशक प्रल्हाद खाडे यांच्यासह ईतर वरीष्ठ अधिकारी, अंमलदार आणि नागरीक उपस्थित होते.
हेही वाचा