अक्कलपाडा योजनेचे काम पूर्ण, धुळेकरांना आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा
धुळे : बहुप्रतीक्षीत अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम अखेर पूर्ण झाले असून, धुळेकरांना आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे धुळेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. खासदार भामरे यांच्यासह महापौर आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी अक्कलपाडा योजनेची पाहणी केली.
भाजपच्या माध्यमातून दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू शकलो याचे मनस्वी समाधान वाटते. धुळेकरांची तहान भागावणाऱ्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वयित झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अमृत योजने अंतर्गत सन २०१९-२३ हि योजना आमच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या योजनेमुळे धुळेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे, असे प्रतिपादन धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लवकरच या योजनेचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहितीही खासदार भामरे यांनी दिली.
170 कोटींची पाणीपुरवठा योजना : धुळे शहरासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पाठपुरावा करुन 170 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. या योजनेचे काम पूर्ण झाले आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी पंप सुरू करून अक्कलपाडा प्रकल्पातील जल शुद्धीकरण केंद्राकडे पोहोचविण्याचा शुभारंभ झाला होता. चाचणी यशस्वी देखील झाली होती. या १७० कोटींच्या महात्वाकांशी योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष महाजन, आमदार जयकुमार रावल यांच्या विशेष सहकार्याने हि योजना कार्यान्वित झाली आहे. तसेच या योजनेसाठी माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, विद्यमान महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर शितलकुमार नवले, सभापती किरण कुलेवार यांचेही सहकार्य लाभल्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले.
खासदारांनी केली पाहणी : खासदारांनी सोमवारी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त अमिता दगडे-पाटील, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उपमहापौर किर्ती वराडे, सभापती किरण कुलेवार, नगरसेवक शितल नवले, अमोल मासुळे, राजेश पवार, सरचिटणीस यशवंत येवलेकर, उपाध्यक्ष शाम पाटील, राकेश कुलेवर, योगेश मुकुंदे, भगवान देवरे, मनीषा ठाकूर, गीता कटारिया, सुनीता देवरे, कामगार आघाडी अध्यक्ष भागवत चीतळकर, उपाध्यक्ष नरेश हिरे, अग्रवाल नगर मंडळ अध्यक्ष ईश्वर पाटील, साक्री रोड मंडळ अध्यक्ष भीलेश खेडकर, भटके विमुक्त जाती आघाडी अध्यक्ष अण्णसाहेब खेमनार, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष मतीन खाटीक, दिव्यांग विकास आघाडीचे उपाध्यक्ष इकबाल पटेल यांच्या समवेत मनपा अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत उगले यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शहराच्या ८० टक्के भागात पाणीपुरवठा : अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेला उशीर झाला असला तरी ती आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. हि योजना पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक अडथळे आले. विरोधकांनी या कामावरून टीका केल्या. मात्र आम्ही आमचे काम करत राहिलो. या योजनेमुळे धुळे शहतारील ८० टक्के भागात गेल्या १५ दिवसांपासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्याबद्दल मनपा कर्मचारी, अधिकारी आणि नगरसेवक यांचेही आभार मानत असल्याचे यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.
गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा : खासदार भामरे पुढे म्हणाले, अक्कलपाडा प्रकल्पातून धुळेकरांना ग्रॅव्हीटीने म्हणजे गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा योजनेचे तांत्रिक कामकाज नुकतेच पूर्ण झाले. या ठिकाणी वेगवेगळ्या पाच पंपांमधून पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. पैकी तीन पंप चालू ठेवून दोन पंप कायम राखीव राहणार आहेत. संकटकाळी हे राखीव पंप सुरू करण्यात येतील. एखादा पंप नादुरुस्त झाला की राखीव पंपांच्या माध्यमातून पर्यायी कामकाज होऊ शकेल. यामुळे नियमित पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार नाही. ताशी ३० लाख लिटर पाणी ओढण्याची क्षमता एका तासात एकाच पंपाच्या माध्यमातून जवळपास दहा लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. निरनिराळ्या तीन पंपांमधून एका तासाला तीस लाख लिटर पाणी धुळेकरांसाठी उपलब्ध होऊ शकेल. हे सर्व पाणी जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून प्रक्रियेनंतर धुळेकरांच्या घरात पोहचत आहे.
भाजपाने दिलेला शब्द खरा ठरविला : ही योजना पूर्ण झाली असून धुळेकरांना दोन दिवसाआड पाणी पुरवण्याचा भाजपाने दिलेला शब्द खरा ठरविला. या योजनेमुळे असा अनुभव आला की, 133 केव्ही सब स्टेशन सुरू झाल्यानंतर येथे एकाच वेळी तीन पंप सुरू करण्यात येतील. यामुळे मुबलक पाणी उपलब्ध होणार होते. यामुळे धुळेकरांना एक ते दोन दिवसाआड पुरविण्यासाठी ते पुरेसे असणार आहे. मात्र आज या योजनेसाठी १३३ केव्हीचे सबस्टेशन देखील पूर्ण झाले आहे. योजनेच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सहकार्य केले, याची खा. डॉ. भामरे यांनी जाणीवपूर्वक आठवण करून दिली.
हेही वाचा