झोपा काढणाऱ्यांनी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे श्रेय घेऊ नये, आमदारांची टीका
धुळे : अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना आपल्या प्रयत्नांमुळेच पूर्ण झाली असून, धुळेकरांना आम्ही एक दिवसाआड पाणी देऊ. घरात झोपा काढणाऱ्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये, अशी टीका आमदार फारुख शाह यांनी केली.
खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी अक्कलपाडा योजनेच्या कामाची पाहणी करून काम पूर्ण झाल्याची घोषणा केली. त्यानंतर सायंकाळी अम्युझमेंट पार्क कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गृहमंत्र्यांकडे तक्रार करणारच! : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचे आव्हान दिले असल्याची माहिती मिळाली आहे. मी त्यांचे चॅलेंज स्वीकारले आहे. धुळे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात गृहमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.
अम्युझमेंट पार्क कामाचा शुभारंभ : धुळे महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधा विकास योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मध्ये सर्व्हे क्रमांक ४३६ येथे मिनी ॲम्युझमेंट पार्क व प्ले ग्राउंड तयार करण्यात येत आहे. ४ कोटी रुपये खर्चाच्या या कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. मुस्लीमबहुल भागात सुलतानिया मदरसा समोर हे गार्डन तयार करण्यात येत आहे.
हेही वाचा