व्यंकट रमणा… गोविंदा… सोनगीरला श्री बालाजी रथोत्सव
धुळे : व्यंकट रमणा… गोविंदाच्या जय घोषणात सोनगीरला बालाजी रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
![](https://i0.wp.com/no1maharashtra.com/wp-content/uploads/2023/10/ram-bhalane-balaji-rathostav-news-2023-no1maharashtra.png?resize=263%2C300&ssl=1)
तालुक्यातील सोनगीर येथे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशीला बालाजी रथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी बालाजी रथाची मिरवणूक 25 ऑक्टोंबर रोजी 12 वाजेच्या मुहूर्तावर रथ गल्लीतून काढण्यात आली. याप्रसंगी धुळे ग्रामीण भाजपचे निवडणूक प्रमुख तथा जि. प. सदस्य राम भदाणे यांनी बालाजी रथाचे दर्शन घेतले.
![](https://i0.wp.com/no1maharashtra.com/wp-content/uploads/2023/10/ram-bhalane-balaji-rathostav-news-songir-2023-no1maharashtra.png?resize=300%2C169&ssl=1)
बालाजी रथाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. पंचाक्रोषीतील भावीक-भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या रथ उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे. या रथउत्सवात जि. प. सदस्य राम भदाणे यांच्या हस्ते भक्तांना फराळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी सोनगीर येथील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.