देशभक्ती जागवणारा ‘तेजस’
देशासाठी बलिदान देणे, देशावर होणाऱ्या आतंकी हालचालींचा विरोध करून त्याविरुद्ध लढण्याची हिंमत, जिद्द आणि जबाबदारी समजणे म्हणजे खरी देशभक्ती होय. अशाच गोष्टीवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे ‘तेजस’.
कंगना रणावत प्रमुख भूमिकेत असलेला तेजस सिनेमा शुक्रवार 27 ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. पुरुषप्रधान समाजात महिलांना प्रामुख्याने महत्वाकांक्षी दाखवले आहे. महिला देखील कुठेच पुरुषांच्या तुलनेत मागे नाहीत असे या सिनेमात अधोरेखित केले आहे.
कंगना (तेजस) ची भूमिका निभावत देशावर येणाऱ्या संकटाशी लढणे, आपली जबाबदारी समजते.
एक फायटर वैमानिक अशी तिची ओळख असते. देशासाठी लढणे आणि मरणे या पलीकडे दुसरे काहीच नाही असा तिचा विचार असतो.
युद्ध हे फक्त सीमेवरच होते असे नाही. हवाई युद्ध देखील तेवढेच महत्त्वाचे असते, जे या सिनेमातून दिसून येते.
सिनेमाची कथा छान असून, पटकथा प्रेक्षकांना बांधून ठेवणारी आहे. या सिनेमाचे चित्रकरण खूप सुंदर झालंय. देशासाठी लढण्याचा जज्बा तेजस मधून कंगना रणावतने दाखवला. तो कौतुकास्पद आहे. तिची संवादफेक चांगली असून, अभिनय देखील सुंदर केला. शिवाय एक फायटर वैमानिकच्या भूमिकेत आकर्षक दिसलीय. याशिवाय अन्य कलावंतांनी आपल्या वाटेला आलेली भूमिका छान साकारली आहे.
एकीकडे देशभक्ती, युद्ध, थ्रील या सिनेमातून आपल्याला दिसते आणि आपले मनोरंजन करण्यास यशस्वी ठरते. दिग्दर्शन देखील सुंदर झाले आहे. चित्रपट बघतांना आपली देखील देशभक्ती कुठेतरी जागी होते यात शंका नाही. त्यामुळे एकदा अवश्य पहावा असा हा सिनेमा आहे.
– राज किशन, धुळे
Mob. 9022835980
हेही वाचा