मराठा आरक्षण आंदोलनास आरपीआयचा पाठिंबा
धुळे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धुळे शहरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने जाहीर पाठिंबा दिला.
आरपीआय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी धुळे शहरातील क्युमाईन क्लब रस्त्यावर आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबाचे पत्र दिले. पत्रात म्हटले आहे की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष हा सदैव मराठा समाजाच्या सोबत आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासूनची ही मागणी आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला व धुळे जिल्हा मराठी क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, प्रभाकर जाधव, राजूबाबा शिरसाठ, प्रेम अहिरे, आबा खंडारे, संजय बैसाणे, काशिनाथ साबळे, नयनाताई दामोदर, बुद्धप्रिया पगारे, सरलाताई निकम, डॉ. भूषण पाटील आणि देवा वाघ आदी उपस्थित होते.