नंदुरबार तालुक्यासाठी दुष्काळाच्या सवलती लागू : मनीषा खत्री
नंदुरबार : माहे जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावीत झालेल्या जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यामध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करुन सवलती लागू केल्या असल्याचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय आदेशान्वये कळविले आहे.
नंदुरबार तालुक्यासाठी लागू असलेल्या सवलती:
जमीन महसुलात सुट.
पिक कर्जाचे पुनर्गठन.
शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती.
कृषी पंपाच्या चालु विजबिलात 33.5 टक्के सुट.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी.
रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.
आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर.
टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.