वलवाडीतील कॉलन्यांमध्ये आमदार मंजुळा गावित यांचा विकासकामांचा धडाका
धुळे : मनपाच्या माजी महापौर तथा साक्री तालुका विधानसभेच्या आमदार मंजुळाताई गावित आणि शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांच्या सौजन्याने देवमोगरा कॉलनी, एकता कॉलनी व नयना कॉलनी या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. रस्ते डांबरीकरण, गटारी, खुल्या मैदानाला वॉल कंपाऊंड, हायमास्ट लाईट, बाकडे, खुल्या मैदानातील खेळणी साहित्य, वॉकिंग ट्रॅक, इत्यादी कामांचे उद्घाटन करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहिलेल्या कॉलनीला अखेर मंजुळताई गावित यांनी प्रथम मंदिरात जाऊन कुलदैवत देवमोगरा मातेचे दर्शन घेतले. देवमोगरा कॉलनीवासीयांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत केले. यावेळी मंचावर प्रतिभा कैलास शिंदे, मयुर शिंदे, मुख्याध्यापक सुभाष वसावे, नगरचनकार भटू पवार, माजी उपसरपंच, वलवाडी जगदीश चव्हाण, वन धिकारी रतनसिंग वसावे आदी उपस्थित होते.
कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ओळख असलेल्या मंजुळाताई गावित यांनी कॉलनीवासीयांना सांगितले की, माझ्या अखत्यारित येणारी विकासकामे करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असून आगामी काळात काही उर्वरित कामं देखील लवकरात लवकर पूर्ण होतील. कॉलनीच्या विकासासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले जातील व निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले.
कॉलनिवासीयांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळाले व उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन सोहळा झाला.
सदर कामाचे सूचक, अनुमोदक हे संपूर्ण संबंधित कॉलनीचे राहवासी होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने कॉलनीवासी, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शक भटू पवार, संयोजक प्रकाश पवार, योगेश वसावे, महेंद्र पवार, दादाभाई पवार, जितेंद्र देवरे, विजय अहिरे, धर्मराज जगताप, विलास वसावे, काळू जगताप, रामदास पवार, कैलास देशमुख, राज ठाकूर, पवन कुवर, निलेश ठाकूर, महेंद्र महाले, ईश्वर पवार, अशोक ठाकरे, संजीव पावरा आदी होते.
देवमोगरा कॉलनीतर्फे ताईंचे स्वागत रेखा पवार, सुषमा गावित, कविता पवार, सुवर्णा पवार व महिला वर्गानी केले. त्याचप्रमाणे एकता नगर, नयना कॉलनीतर्फे ताईंचे स्वागत पुष्पाताई कोकणी, रामदास बागुल, जितेंद्र चित्ते, योगेश पाटील, पंकज चौरे आदींनी केले. प्रमिलाताई पाडवी यांनी कॉलनीच्या वतीने ऋणानुबंध व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गेश बोरसे यांनी व प्रस्तावना अरविंद गायकवाड यांनी केली . कार्यक्रमाचा समारोप अशोक पाडवी यांनी आभार प्रदर्शनातून केला.