राम भदाणे यांच्यातर्फे मोफत वाहनांची व्यवस्था
धुळे : येथे 15 ते 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत अंतरराष्ट्रीय कथाकार प. पु. पंडीत प्रदिप मिश्रा सिहोरकर यांच्या शिव महापुण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे शहरातील सुरत बायपास लगत असलेल्या शासकीय हिरे वैद्यकिय महाविद्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या जागेवर कथा होणार आहे.
सदर कथा श्रवणाचा धुळे तालुक्यातील सर्व माता-भगिणींना लाभा व्हावा असा सेवाभाव मनात ठेवून भाजपाचे धुळे ग्रामीणचे निवडणूक प्रमुख तथा जि. प. सदस्य राम भदाणे यांनी माता भगिणींसाठी मोफत सुमारे एक हजार वाहनांची सोय करुन दिली आहे. सदर सेवा हि सतत पाच दिवस देण्यात येणार आहे. या सेवेचा धुळे तालुक्यातील सर्व माता भगिणींनी लाभ घ्यावा, असे अवाहन जि. प. सदस्य राम भदाणे यांनी केले आहे.
धुळे येथे पहिल्यांदाच अंतरराष्ट्रीय कथाकार पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून शिव महापुरान कथा होत आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील माता-भगिणींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ज्या दिवसापासून महा शिवुपराण कथेची बातमी सर्वसामान्यापर्यंत पोहचली, त्या दिवपासून तालुक्यात भक्तीमय वातावरण आहे. कथेला जाण्याची उत्सुकाता निर्माण झालेली आहे. सदर कथेस लाखो भावीक येणार असल्याने धुळे तालुक्यातील महिला माता-भगिणींची कथेला येण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी जि. प. सदस्य राम भदाणे यांनी मोफत वाहनाची सोय उपलब्ध करुन दिली आहे.
सदर कथा श्रवणाचा लाभ धुळे तालुक्यातील सर्व माता-भगिणींना व्हावा असा सेवाभाव मनात ठेवून जि.प.सदस्य राम भदाणे यांनी सतत पाच दिवस मोफत वाहनांची सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत धुळे तालुक्यातील माता भगिणींसााठी 152 गावांतील सुमारे एक हजार गाड्या शिव महापुराण कथेसाठी बुक करण्यात आल्या असून पंडीत प्रदिप मिश्राच्या मधुर वाणीतून कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे अवाहन जि. प. सदस्य राम भदाणे यांनी केले आहे.
हेही वाचा