राष्ट्रवादी आपल्या दारी… जनतेच्या समस्यांचे निवारण करी…
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांना अभिप्रेत असलेले लोकहिताचे धोरण जपण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून, राष्ट्रवादी आपल्या दारी… जनतेच्या समस्यांचे निवारण करी… या उपक्रमाचे 1 डिसेंबरपासून आयोजन करण्यात येत आहे.
या अभिनव उपक्रमाचा धुळे जिल्हातील पहीला टप्पा धुळे महानगरात सुरू होऊन प्रत्येक प्रभागातील सामान्य जनतेशी संवाद साधत त्यांच्या प्रशासन, आरोग्य व नागरी सुविधा, सामाजिक अडचणी संदर्भातील प्रश्न जाणून ते मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते एकवटणार आहेत. तर या उपक्रमाचा दुसरा टप्पा धुळे जिल्हा ग्रामीण येथे होऊन उपक्रमाची सांगता होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी ही सर्वसामान्य जनतेशी असल्यामुळें राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हातील नेते माजी मंत्री हेमंत देशमुख, किरण शिंदे, किरण पाटील, ज्ञानेश्वर आबा भामरे, जि. प. गटनेते पोपटराव सोनवणे, सुरेश सोनवणे, जि. प. सदस्य दिनेश मोरे, शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादीचे गणेश जाधव, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाठ, सत्यजित सिसोदे, युवक प्रदेश सरचिटणीस मयूर बोरसे-पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुमित पवार, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक जगताप, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, उमेश महाजन यांच्या सहकार्याने तथा पक्षाच्या सर्व सेलच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या सहभागातून, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजहिताची धोरणं जपण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. – सारांश भावसार, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र राज्य
कोणत्याही पक्षाचा नेता आपल्या दारी आल्यास त्याचे तोंड काळे करून परत त्याच्या घरी पाठवा सगळे साले चोर आणि स्वार्थी देशद्रोही आहेत