पोलिस पाटलांच्या मागण्या अधिवेशनात मांडणार : आ. कुणाल पाटील
धुळे : गावात शांतता आणि सलोखा राखणारा महत्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील असून त्यांच्या न्याय मागण्या अधिवेशनात माडणार. मुंबईतील धरणे आंदोलनास माझा पाठींबा असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी धुळे तालुका पोलिस पाटील संघाच्या पदाधिकार्यांना सांगितले.
राज्यातील पोलिस पाटलांचे दि.28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान मुंबई येथे उपोषण व धरणे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलिस पाटील संघाने आ.कुणाल पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. पोलिस पाटलांचे मानधन 25 हजार रु.करण्यात यावे, ग्राम पोलिस अधिनियम 1967मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे,पहिल्या पाच वर्षानंतर पुढचे नुतनीकरण कायमचे बंद करावे, शासनाकडून पोलिस पाटील व कुटूंबियांना मेडिक्लेमचा लाभ मिळावा,निवृत्तीचे वय 65 वर्षापर्यंत करावे,निवृत्तीनंतर ठोस रक्कम 10 लक्ष रुपये मिळावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यातआले.
पोलिस पाटलांच्या मागण्या अधिवेशनात मांडून आवाज उठविणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले. दरम्यान मुंबईतील पोलिस पाटलांच्या आंदोलनाला माझा पाठींबा असल्याचेही आ. कुणाल पाटील यांनी सांगितले.