निवडणुका जवळ आहेत… ‘मोऱ्या’ पाहायला नक्की जा!
धुळे : टार्टूग़ा मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मोऱ्या’ या मराठी चित्रपटाचा स्क्रीनिंग शो निवडक शंभर मान्यवरांच्या उपस्थितीत धुळे शहरातील क्युमाईन क्क्लबसमोरील सीताराम पानट सभागृहात मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी पार पडला.
चित्रपट स्क्रीनिंग सुरु करण्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. मागासवर्गीयांना मिळालेल्या राजकीय आरक्षणाचा प्रस्थापित पुढारी कशा पध्दतीने गैरफायदा घेतात ही या चित्रपटाची कथा आहे. निवडणुका जवळ असल्याने आपल्या शेजारच्या थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पहावा, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ गीतकार विश्राम बिरारी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद नियामक मंडळ सदस्य चंद्रशेखर पाटील, आजाद समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे, मोऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक जितेंद्र पुंडलिक बर्डे, निर्मात्या तृप्ती कुलकर्णी, राजेश विश्वनाथ अहिवले, अमित सोळंकी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. जितेंद्र बर्डे दिग्दर्शित “मोऱ्या” हा चित्रपट जानेवारी २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट विविध फिल्म फेस्टिवलमध्ये आतापर्यंत प्रदर्शित झाला असून, राष्ट्रीयआणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने याला सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपटाचं चित्रीकरण हे खान्देशातील पिंपळनेर परिसरात झाले आहे. या चित्रपटाने मराठी फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूड व विदेशाचंही लक्ष वेधून घेतलं आहे. सफाई कामगाराच्या जीवनाभोवती फिरणारी मोऱ्या चित्रपटाची कथा थेट प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेते. याकरिता मराठी रसिकांसह खान्देशी कलारसिकांनी व जनतेने खान्देशपुत्र जितेंद्र बर्डे यांची अप्रतिम कलाकृती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अवश्य पाहावी असं आवाहन अनेक मान्यवरांनी करून जितेंद्र बर्डे यांचं भरभरून कौतुक केलंय.
निर्मात्या तृप्ती कुलकर्णी, राजेश विश्वनाथ अहिवले यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन या जबाबदाऱ्या अत्यंत योग्य पद्धतीने सांभाळून जितेंद्र बर्डे यांनी चित्रपट नायकाची भूमिका अत्यंत प्रभावीरीत्या साकारली आहे. सहनिर्माते मंदार मांडके, राहुल रोकडे, पुनम नागपूरकर, डॉ. सचिन पाटील (स्वामी), प्रेरणा धजेकर, छायांकन आकाश काकडे, संगीत अमोघ इनामदार, गायक अवधूत गुप्ते गीते, केदार भागवत, संकलन रोहन, पाटील रंगभूषा ललित कुलकर्णी वेशभूषा मीनाक्षी नायर डी. आय. कलरिस्ट हितेंद्र परब व्हि एफ् एक्स आणि ग्राफिक्स विहांग चव्हाण, आनंद पुसाळकर ध्वनी आरेखन विक्रांत पवार, कार्यकारी निर्माता राहुल ओमनकर, पीआरओ राम कोंडीलकर, सहाय्यक दिग्दर्शक श्रेयस गौतम, करण मोरे, मेकिंग यश लांडगे, फेस्टिवल स्ट्रेटेजी मोहन दास यांनी आपल्या जबाबदाऱ्या उत्तमपणे निभावल्या आहेत.
मोऱ्या चित्रपट पाहिल्यावर मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना चित्रपटाच्या दर्जेदारपणाची खूप तारीफ केली.