धुळे शहरातील तरूणाला गावठी पिस्तूलसह सोनगीरला पकडले
धुळे : दरोडा आणि खंडणीसह वेगवेगळ्या पाच गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या धुळे शहरातील भागातील तरुणाला गावठी कट्ट्यासह एलसीबीच्या पथकाने सोनगीरजवळ शनिवारी अटक केली.
सोनगीर ता. धुळे गावाच्या शिवारात एका हॉटेलजवळ मयुर उर्फ बबुवा सुरेश कंडारे (वय 26, रा. अहिल्यादेवीनगर, चितोड रोड, धुळे) हा तरुण दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तुलसह फिरत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने सोनगीरच्या हॉटेलजवळ जावून मयुर कंडारे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४२ हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तुल, दोन जीवंत काडतुसे आढळून आली. मुयर कंडारे याच्याविरुध्द आझादनगर, चाळीसगाव रोड आणि शहर पोलिसात दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे, पीएसआय प्रकाश पाटील, एएसआय शाम निकम, हेड कॉन्स्टेबल सुरेश भालेराव, पोलीस नाईक रविकिरण राठोड, कॉन्स्टेबल निलेश पोतदार, सुशिल शेेंडे, जितेंद्र वाघ, सागर शिर्के, हर्षल चौधरी, गुणवंतराव पाटील यांच्या पथकाने केली.
हेही वाचा