जागतिक अपंग दिनानिमित्त एसीपीएम दंत महाविद्यालयातर्फे दंतरोग तपासणी व उपचार शिबिर
धुळे : ३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम दंत महाविद्यालय येथील बालरोग चिकित्सा विभागाच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेने दंतरोग तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.
सदरी शिबिर २४ नोव्हेंबर व १ डिसेंबर अशा दोन टप्प्यात संस्कार मतिमंद मुलींची शाळा , धुळे येथे पार पडले. प्रथम टप्प्यात सर्व मुलींची दंत तपासणी व मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे कृतीतून मार्गदर्शन करण्यात आले. त्याच सोबत सर्वांना टूथ ब्रश व टूथ पेस्टचे वाटप केले गेले. शिबिराच्या दुसऱ्या टप्प्यात दंत महाविद्यालयाच्या बालरोग चिकित्सा विभागाच्या विभागप्रमुख डॉ. प्रशांत बोंदार्डे ,डॉ. अरुणा विश्वकर्मा,डॉ संदेश बन्सल, डॉ पूजा दैलानी व सर्व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी संस्कार शाळेतील ५५ मुलींचे उपचार केले. दात साफ करणे, दातांची कीड काढून सिमेंट भरणे अशा प्रकिया केल्या. मतिमंद मुलींच्या मौखिक उपचारातील आव्हाने ओळखत त्यांच्या विशिष्ट गरजांचा समावेश करण्यात आला.
या उपक्रमाचे जवाहर मेडिकल फाउंडेशनचे चेअरमन आ. कुणाल बाबा पाटील, सचिव डॉ. ममताताई पाटील, जॉइंट सेक्रेटरी संगीता पाटील कौतुक केले. दंतरोग तपासणी व उपचार शिबिर एसीपीएम दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण डोडामणी यांच्या मार्गर्शनाखाली संपन्न झाले. शिबिराची सांगता फळे वाटप करून करण्यात आली.
हेही वाचा