मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत मुस्लीम समाजातर्फे स्नेहभोजन
धुळे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची धुळ्यात तीन डिसेंबरला सभा झाली. सभेसाठी आलेल्या हजारो मराठा बांधवांसाठी मुस्लीम समाजाच्या वतीने स्नेह भोजनाचे आयोजन केले होते.
साक्री, पारोळा, मालेगाव, चाळीसगाव, शिरपूर, नरडाणा, सोनगीर, कुसुंबा, नेर अशा विविध ठिकाणावर मोठ्या संख्येत मराठा समाज या सभेसाठी आलेला होता. त्यासाठी आज सकल मुस्लीम समाजाच्या वतीने महानगरपालिका, संतोषी माता चौक, महानगरपालिका चौक व तहसीलदार ऑफिसजवळ स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती.
हेही वाचा