आतापर्यंतचा सर्वात हिंसक, अश्लील चित्रपट ‘ॲनिमल’
हिंदी सिनेसृष्टीत आतापर्यंतचा सर्वात जास्त हिंसक असलेला चित्रपट ‘ॲनिमल’ सर्वत्र प्रदर्शित झाला.
चित्रपटाची कथा : चित्रपटाची कथा छान आहे. वडील आणि मुलाचा संघर्ष, वडिलांप्रती असलेले मुलाचे प्रेम हे उत्कृष्ट पद्धतीने दाखवण्यात आले आहे. चित्रपटात येणाऱ्या घडामोडी आकर्षित करतात. एका मुलाची आपल्या वडिलांप्रती असलेली जाणीव, भावना, प्रेम आणि काळजी या विषयावर आहे. एका श्रीमंत घराण्यात जन्मलेला रणविजय म्हणजेचज् (रणबीर कपूर) लहानपणापासूनच बापाच्या प्रेमासाठी संघर्ष करत असतो. रणवीरच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले अनिल कपूर नेहमी आपल्या कामात व्यस्त असल्याकारणाने मुलाकडे बरोबर लक्ष देत नाही. त्यामुळे रणविजय हा आपली मनमानी करत असतो. यालाच कंटाळून वडील त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकतात. कालांतराने जेव्हा तो तरूण होतो आणि परत आपल्या घरी येतो. यावेळीही त्याला तीच वागणूक दिली जाते. यावर पर्याय म्हणून रणबीर कपूर घर सोडण्याचा निर्णय घेतो आणि सोबत आपली प्रेयसी गीतांजली (रश्मिका मंदाना) हिला आपल्या सोबत नेतो.
एका दिवशी टीव्हीवर बातमी येते की, बलवीरसिंग म्हणजे अनिल कपूरवर हल्ला होतो. हल्ला कोणी केला? का केला? हे कोणालाही माहीत नसते. त्यामुळे रणबीर कपूर येतो आणि या सर्वांचा शोध घेतो. आता या हल्ल्यात नेमके कोण कोण सामिल आहे हेच शोधणे रणबीर कपूरच्या जीवनाचा उद्देश बनतो. याच दरम्यान होणारी हिंसा सर्वोच्च पातळीवर जाते. आजवर् कुठल्याही हिंदी सिनेमात आपण बघितली नसेल इतकी हिंसा या चित्रपटात आहे. आता रणबीर कपूर या सर्वांचा शोध घेईल का? हे सर्व तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल.
चित्रपटाची पटकथा : मध्यंतरापर्यंत चित्रपट एक वेगळीच उत्सुकता निर्माण करतो. जे काही चित्रपटाची उजवी बाजू ते सर्व मध्यंतरापर्यंत दाखवून चित्रपट मोकळा होतो. परंतु मध्यंतरानंतर चित्रपटाचा वेग आणि चित्रपटाबद्दल असलेली अपेक्षा ही थोडक्यात भंग होते. चित्रपट मूळ कथेपासून थोडक्यात भरकटलेला वाटतो आणि चित्रपटाची लांबी जास्त असल्यामुळे थोडा रटाळ वाटतो. चित्रपटाचे संवाद छान आहेत. काही ठिकाणचे संवाद अश्लील असल्याने फारसे प्रभावी वाटत नाहीत. रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांची पिता-पुत्रांची केमिस्ट्री छान दिसून आली. दोघांनीही छान अभिनय केलाय.
खलनायकाच्या भूमिकेत बॉबी देओलने आपल्या वाटेला आलेली छोटीशी भूमिका छान साकारलीय. यासह रश्मिका मंदांना आणि इतर सह कलाकारांनी आपल्या वाटेला आलेल्या भूमिका छान करण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे ते पार्श्वसंगित. अप्रतिम पार्श्वसंगीतामुळे प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात. एकंदरीतच हिंसा, बदला, प्रेम या गोष्टींच्या अवतीभोवती फिरणारा हा चित्रपट आहे.
हा चित्रपट आजच्या पीढिला जरी आवडत असला तरी सामान्य प्रेक्षकांना किंवा कुटुंबासोबत चित्रपट बघणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट कदाचित आवडणार नाही. कारण चित्रपटात अपेक्षेपेक्षाही जास्त हिंसा, अश्लीलता आणि चित्रपटाला मिळालेला ए सर्टिफिकेट हे मुख्य कारण आहे. परंतु हा चित्रपट इतर सर्व प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल आणि बॉक्स ऑफिसवर आपली बंपर कमाई करेल यात तीळमात्रही शंका नाही.